Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कचऱ्याची घंटागाडी 1 मेपासून रोज येणार; संकलनाची वाहने आता 350 वरून 477




घरोघरी कचरा संकलन आणि वाहतूक प्रकल्पाचे काम आता १ मेपासून सुरू करण्याचा मुहूर्त निघाला आहे. अहमदाबादच्या ‘वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला १९ नोव्हेंबर २०२५ रोजी हे काम दिले आहे. या कंत्राटानुसार ४७७ कचरा संकलन वाहनांचा ताफा उतरणार आहे. त्यामुळे आता रोज कचरा संकलन केले जाईल. पूर्वी ३५० वाहनांतून कचरा संकलन केले जात होते. महिन्याला सुमारे ८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून रेड्डी कंपनीला सुमारे ३ कोटी रुपये दिले जात होते. १९ नोव्हेंबरपासून १२० दिवसांच्या आत कंपनीला शहरात काम सुरू करणे बंधनकारक होते. मात्र ५ महिने उलटून गेले तरी कचरा उचलणे सुरू झालेले नाही. रेड्डी कंपनीच्या कामाची मुदत ३१ मार्च रोजी संपली. नवी कंत्राटानुसार प्रत्येक वाहनाची आणि सोसायटीची ‘पॉइंट ऑफ इंटरेस्ट’द्वारे एक्सेल डेटा फाइल तयार करून ई-गव्हर्नन्सद्वारे वाहनांच्या मार्गाचे ट्रॅकिंग अनिवार्य आहे. दुर्गंधी टाळण्यासाठी सर्व वाहने दररोज धुवून निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. प्रत्येक गाडीला ८ तासांच्या शिफ्टमध्ये २ फेऱ्या कराव्या लागतील. कचरा संकलन करणाऱ्या गाड्या बंदिस्त असतील. घरोघरी कचरा संकलन वाहने (चालक व कामगारासह) कामाचा/वाहनाचा प्रकार वाहन अंतिम एकूण संख्या दर रक्कम (रु.)
७५० किलो क्षमतेचे टाटा एस ५० ४,०१० रु. २,००,५००
७५० किलो क्षमतेची ईव्ही थ्री-व्हीलर ३० ३,७५० रु. १,१२,५००
१००० किलोची छोटी मालवाहू वाहने ३२० ५,१३० रु. १६,४१,६००
३००० किलो क्षमतेची वाहने ५० ५,५०० रु. २,७५,०००
१६ टन क्षमतेचा टिप्पर ट्रक १८ ६,९५० रु. १,२५,१००
फ्रंट अँड लोडर मशीन ९ ५,९५० रु. ५३,५५० दरामध्ये दरवर्षी ५ टक्के वाढ ‘स्वच्छ भारत मिशन’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शहरात केवळ ‘माहिती, शिक्षण आणि संवाद’, जनसंपर्क उपक्रम राबवण्यासाठी महापालिका या कंपनीला दररोज तब्बल १ लाख ४३ हजार रुपये देणार आहे. त्याचबरोबर कंत्राटानुसार या मंजूर दरांमध्ये दरवर्षी ५ टक्के वाढही दिली जाणार आहे. जनजागृती गरजेची टेंडर झाले आहे, त्यामुळे बदल करण्याची शक्यता कमी आहे. स्वच्छ करून देशातील दहा स्वच्छ शहरांत येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आयईसीच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. – समीर राजूरकर, महापौर वसुली वाढवावी लागेल कचरा संकलन लवकरात लवकर सुरू करून शहर स्वच्छ करण्याचा मानस आहे. आता कराची वसुली वाढवावी लागेल. – अमोल येडगे, आयुक्त अहमदाबादची ‘वेस्टर्न इमॅजिनरी’करणार शहरातील कचरा जमा
जनजागृती उपक्रम : आयईसी आणि जनसंपर्क जनजागृती उपक्रम – प्रतिदिन १,४३,००० रु
कचरा व्यवस्थापन : १० टन क्षमतेच्या ३ एमआरएफ केंद्रांचे व्यवस्थापन : ३० टन, ५५० रु. (प्रतिटन) – ६,५००



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *