![]()
राज्यात कोकण पट्ट्यात पुढील दोन दिवस उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अकोल्यात सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. यात अमरावती- 44.8, वर्धा- 44.4, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली- 44.0 अंश. पुढील तीन दिवसविदर्भामध्ये उष्णतेची लाट राहील. त्यानंतर पाऊस होऊ शकतो. परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी दिला. अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे येत असल्याने उन्हासोबत पावसाच्या सरी असा अनुभव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत येऊ शकतो. दरम्यान, सोलापूर िजल्ह्यात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. बार्शी तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. विदर्भात उष्णतेच्या लाटेनंतर पावसाची शक्यता विदर्भात सोमवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. अमरावती, अकोला तसेच वर्ध्यात सध्या तापमानाचा पारा अधिक आहे. अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून, सोमवारनंतर या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागात दोन दिवस पारा 45 अंश सेल्सिपर्यंत राहणार आहे. अमरावती, अकोला, वर्धेला उष्णतेच्या लाटेचा इशारा महाराष्ट्रावर सध्या चक्रवाती वारे तसेच विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा दबाव आहे. तापमानात चढ उतार होत आहे. कोकण पट्ट्यात शुक्रवारी मुंबई, ठाणे, रागयड जिल्ह्यांत उष्ण हवामान होते, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. गेल्या 24 तासांत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. विदर्भात अमरावती, अकोला, वर्धा तर कोकणात रायगड, ठाणे येथे शनिवारी उष्णतेचा यलो अलर्ट आहे. झाडाखाली बसले असताना वीज कोसळली बार्शी | तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वेळी श्रीपतपिंपरी येथील बाळासाहेब तानाजी गरदडे (वय 45) हे घाडगे अण्णा वस्ती येथे आंब्याच्या झाडाखाली बसले असता वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ट्रफ रेषा सक्रिय झाल्याने वातावरणात हा बदल
Source link
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दाेन दिवस अवकाळी पावसाचा इशारा:अकाेला सर्वाधिक 45 अंश, संभाजीनगरात 41.60 तापमान