Headlines

अर्थमंत्र्यांचा इशारा:भारतीय बँकांपुढे एआयचे सायबर संकट, आता बँकांना तातडीने नवी सुरक्षा यंत्रणा उभारावी लागेल




अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या प्रमुखांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लाऊड मिथोस’शी संबंधित संभाव्य धोक्यांवर चर्चा केली. त्या म्हणाल्या, ही शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता कोणत्याही यंत्रणेत अनधिकृत प्रवेश (हॅक) करू शकते. त्यामुळे या क्षेत्रावरील कोणत्याही सायबर हल्ल्याची ओळख पटवून त्यावर त्वरित कारवाई करू शकेल, अशी नवी सुरक्षा यंत्रणा तातडीने उभी करावी लागेल. पुण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनानंतर केल्यानंतर अर्थमंत्री म्हणाल्या, भारतीय बँकांनी स्वतःसाठी खूप चांगले काम केले आहे. ‘क्लाऊड मिथोस’… कोणतीही यंत्रणा मोडीत काढण्यास सक्षम अँथ्रोपिकचे ‘क्लाऊड मिथोस’ काय आहे?
हे अँथ्रोपिक कंपनीद्वारे विकसित केलेले आतापर्यंतचे सर्वात प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रतिरूप आहे, जे विशेषतः कोडिंग आणि सायबर सुरक्षेसाठी तयार करण्यात आले आहे. याची इतकी चर्चा का होत आहे? हे सॉफ्टवेअरमधील उणिवा अत्यंत वेगाने शोधण्यात सक्षम आहे. याने संगणकीय प्रणालीमधील (ऑपरेटिंग सिस्टिम) अशा २७ वर्षे जुन्या त्रुटी शोधून काढल्या आहेत, ज्या आजवर कोणत्याही मानवाला शोधता आल्या नव्हत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *