हास्ययोग म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था:नवचैतन्य हास्ययोग परिवार गुरुपौर्णिमा सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘हास्ययोग’ म्हणजे जीवनातील आनंद आणि दुःख या दोन्ही परिस्थितीकडे समबुद्धीने पाहण्याची ‘स्थितप्रज्ञ अवस्था’ असल्याचे मत व्यक्त केले. नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि श्री सरस्वती कराड हॉस्पिटलतर्फे आयोजित गुरुपौर्णिमा – गुरु सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुण्यातील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन…