Headlines

Savner Gas-Based Fertilizer Plant; GAIL & RCF Sign Agreement



नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे १० हजार कोटी रुपयांचा गॅस-आधारित खत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ‘गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ (GAIL) आणि ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड’ (RCF) या दोन म

.

विशेष उद्देश कंपनी अंतर्गत साकारणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वार्षिक १.२७ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा युरिया निर्मिती कारखाना उभारला जाईल. हा प्रकल्प मुंबई-नागपूर-झारसुगुडा नैसर्गिक वायू पाइपलाइनजवळ असल्याने त्याला थेट वायू पुरवठा मिळेल. यामुळे देशातील युरियाचे उत्पादन वाढेल आणि खतांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

या प्रकल्पातून हजारो तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

विदर्भातील शेतकऱ्यांना ऐन हंगामात युरिया आणि इतर रासायनिक खतांचा तुटवडा, काळाबाजार आणि दरांमधील अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. सावनेरमध्ये खत निर्मिती सुरू झाल्याने संपूर्ण मध्य भारतात युरियाचा पुरवठा सुरळीत होईल. यामुळे खतांचे दर स्थिर राहतील आणि शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल, तसेच त्यांना वेळेवर खते उपलब्ध होतील.

आमदार आशिष देशमुख यांनी २०२३ पासून हा प्रकल्प सावनेरमध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि रसायन व खत मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि राज्य सरकारच्या शिफारशीनंतर केंद्राने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

सावनेर परिसरातील खुर्सापार, जटामखोरा आणि जलालखेडा येथील जागेची प्राथमिक पाहणी पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकारण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *