संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे वर्ष
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पायी पालखी सोहळयाचे रविवारी ता. ५ पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून सोमवारी हिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे. पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. नर्सी नामदेव येथून दुपारी रामकृष्ण हरीच्या गजरात पालखी निघाली. यावेळी संस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन…