Headlines

माजी पंतप्रधान चंद्रशेखर जन्मशताब्दीनिमित्त परिसंवादास चांगला प्रतिसाद:अरुण श्रीवास्तव: समाजवादी विचार पुढे नेण्याची आज गरज

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात ‘चंद्रशेखर: विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ समाजवादी नेते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी विचार पुढे नेण्याची आज कधी नव्हे इतकी गरज असल्याचे मत व्यक्त केले. एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, पुणे येथे रविवारी हा परिसंवाद पार पडला. कार्यक्रमाच्या…

Read More

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप केला

दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती सुतार गंभीर जखमी झाल्या होत्या. एम्समध्ये नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनुसार, आकृती दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार येथील रहिवासी होत्या आणि छतरपूरमधील एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होत्या….

Read More

अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासांत 5.13% वाढ:मध्य प्रदेश सीमेवरील पावसामुळे 28.70 दलघमीने वाढला जलसाठा

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या ४८ तासांत ५.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हा जलसाठा २७.७० दशलक्ष घनमीटरने (दलघमी) वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणाचा जलसाठा २५७.७१ दलघमी (४५.६० टक्के) होता. आता तो २८६.१५ दलघमीवर पोहोचला आहे. जलसंपदा…

Read More

मुधोळकर पेठ मनपा उद्यानाची दूरवस्था:व्यायामाचे साहित्य तुटले, गवत वाढले; नागरिकांमध्ये संताप

अमरावती शहरातील मुधोळकर पेठ येथील महानगरपालिकेचे उद्यान सध्या दूरवस्थेत असून देखभालीअभावी ते अस्वच्छ झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उद्यानातील व्यायामाचे साहित्य तुटले असून, वाढलेल्या गवतामुळे पायी फिरणेही कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या आरोग्यासाठी बसवण्यात आलेले ओपन जीमचे साहित्य मोठ्या प्रमाणात तुटले आहे. उद्यानात ठिकठिकाणी गवत आणि झुडपे वाढली असून,…

Read More

गारपीटग्रस्त कांदा, केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत:2 महिन्यांनंतरही नुकसानभरपाई मिळाली नाही

अंजनगाव बारी परिसरातील कांदा आणि केळी उत्पादक शेतकरी मे महिन्यात झालेल्या वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले असले तरी, अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे…

Read More

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांची फसवणूक:तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल

शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १५ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ पासून सुरू होता.साक्षर रोहिदास म्हस्के (वय ५८, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी), बाळासाहेब पाटील (वय ६२, रा. मोशी, भोसरी) आणि अनिल अप्पासाहेब नवले (वय ६०, रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या…

Read More

दोन पोलिस शिपायांविरुद्ध खंडणीचा गुन्हा:बुधवार पेठेत तरुणांना धमकावून पैसे उकळल्याचा आरोप

पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाण्यातील दोन पोलिस शिपायांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेत तीन तरुणांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दोन हजार रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई विवेक पाटील आणि राहुल दाभाडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली…

Read More

तळेगावात रस्त्यावर पाणी, रस्ता खचला:पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीदरम्यान घडली घटना

तळेगाव दाभाडे येथील संभाजीनगर परिसरात मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी येऊन रस्ता खचल्याच्या घटनेनंतर तळेगाव नगर परिषदेने खुलासा केला आहे. ही घटना पाणीपुरवठा योजनेच्या नियोजित तांत्रिक चाचणीदरम्यान घडली, असे नगर परिषदेने स्पष्ट केले. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात पाण्याच्या टाक्या, मुख्य दाबनलिका आणि वितरण नलिका टाकण्याची कामे झाली आहेत. या योजनेतील संभाजीनगर येथील नव्याने बांधलेल्या पाण्याच्या…

Read More

महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण:एसएनडीटीने स्त्री शिक्षणाची परंपरा समृद्ध केली – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या परंपरेला एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढे नेले आहे. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात विद्यापीठाने देशासाठी आदर्श कार्य केले आहे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी म्हटले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हे विद्यापीठ बहुविषयक शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि…

Read More

आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेट उद्ध्वस्त:13 जणांना अटक; पुणे LCB-FDA ची 5 जिल्ह्यांत कारवाई, 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्त कारवाई करत एका मोठ्या आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून, ५ जिल्ह्यांमध्ये छापे टाकून सुमारे ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर हे या रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचे समोर आले आहे. पुणे…

Read More