ऑनलाइन गेमिंगचा नाद भोवला:ठाण्यात तरुणास दीड कोटीचा गंडा; 3 संकेतस्थळे, विविध बँक खातेदारांसह 7 जणांविरुद्ध गुन्हा
ऑनलाइन गेमिंग आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवण्याच्या नादात ठाण्यातील एका २६ वर्षीय तरुणाने तब्बल १.३६ कोटी रुपये गमावले आहेत. सायबर भामट्यांनी अत्यंत शिताफीने जाळे विणून या तरुणाची फसवणूक केली असून याप्रकरणी रविवारी ठाणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑक्टोबर २०२४ ते ३० जून २०२६ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांनी ३ वेबसाइट्स…