Headlines

भूसंपादन:आरापूर एमआयडीसी, 16 दिवसांत जमिनीची 85 टक्केच मोजणी पूर्ण, 2013 च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना मिळणार मोबदला

प्रस्तावित आरापूर एमआयडीसीच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असली तरी १० दिवसांचे जमीन मोजणीचे टार्गेट असलेल्या आरापूर, गवळीशिवरा आणि सुलतानाबाद येथील ८५ टक्केच जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. या तीन गावांतून ७६२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. दहा महिन्यांपूर्वी अधिसूचना काढण्यात आल्यानंतर अखेर ६ मे रोजी मोजणीला सुरुवात झाली. प्रारंभीपासूनच सुलतानाबाद येथील शेतकऱ्यांनी…

Read More

70 वर्षीय चालकाचे नियंत्रण सुटले; ट्रकने 3 महिला वारकऱ्यांना चिरडले:ओव्हरटेकच्या नादात सासवड-जेजुरी मार्गावर अपघात

पंढरीकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दिंडीवर दुसऱ्या दिंडीतील एका ७० वर्षीय आजारी चालकाने ओव्हरटेकच्या नादात ट्रक घातला. यात सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच अंत झाला. तर चौघी जखमी झाल्या. काळाने क्रूर घाला घातला. पुण्याजवळील सासवड-जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे आषाढी पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली आहे….

Read More

हातभट्टीची दारू अधिकृत करा:शासनालाही महसूल मिळेल; रामदास आठवलेंची मागणी; मराठा आरक्षण आणि ओबीसी उपवर्गीकरणावरही भाष्य

आपल्या हटके वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी भिवंडी दौऱ्यात एक अजब मागणी केली आहे. राज्यातील विषारी दारूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकारने ‘हातभट्टीची दारू अधिकृत करावी’, असे अजब विधान आठवलेंनी केले आहे. हे आपले वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी यातून शासनाला महसूल मिळेल आणि…

Read More

वडाळी उद्यानाचे रूप बदलणार:महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केली प्रकल्पाची पाहणी‎

कोरोना काळापासून बंद असलेला वडाळी तलाव आणि उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यासाठी शासनाने २० कोटी रु.चा निधी मंजुर केला असला तरी अद्याप निधीच आला नसल्याने कामाच्या गतीवर परिणाम झाला आहे. या प्रकल्पाला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मनपा स्तरावर प्रयत्न सुरू असून याअंतर्गतच महापौर श्रीचंद तेजवानी यांनी गुरुवारी ९ रोजी वडाळी उद्यानाच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाची…

Read More

बलात्कार प्रकरणी फरार आरोपी लातूरमधून अटक:युवतीवर बलात्कार करून छायाचित्रे प्रसारित करण्याची दिली होती धमकी

बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला लातूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने एका युवतीवर बलात्कार करून तिची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. काशीराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. हरीओम निवास, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च महिन्यात युवतीने फिर्याद दिल्यानंतर भारती…

Read More

एकरकमी अनुदानाच्या प्रतिक्षेत सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस महिलेने प्राण सोडले:उपचारासाठी वेळेत पैसे मिळाले नसल्याचा आरोप

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस महिलेने एकरकमी अनुदानाच्या प्रतिक्षेत प्राण् सोडल्याचा प्रकार घडला आहे. उपचारासाठी पैसे न मिळाल्याने हि परिस्थिती ओढावल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागातील बाबुगिरीचा हा परिणाम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळमनुरी तालु्क्यातील तोंडापूर येथील अंगणवाडी मदतनीस रुख्माबाई भुरके (६०) ह्या सुमारे दिड…

Read More

महाराष्ट्र होरपळणार!:राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांची ओलांडली असून, पुणे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन…

Read More

उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज:ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय – चंद्रशेखर बावनकुळे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटातील सध्याच्या घडामोडी या पक्षांतर्गत नाराजीचेच परिणाम असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटले. ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी खदखद अनेक दिवसांपासून होती, ती…

Read More

पुणे महापालिकेत निधी वाटपात भेदभाव:सुनेत्रा पवारांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; 'सबका साथ, सबका विकास'ची करून दिली आठवण

पुणे महानगरपालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात निधी वाटपावरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक निधी मिळाल्याचे समोर आल्यानंतर, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ची आठवण करून देत, “शहराचा…

Read More

'नोकरी सोडली तर घरचे म्हणाले- सगळे रस्त्यावर येतील':कॉमेडियन हर्ष गुजरालने सांगितले आयुष्यातील सर्वात मोठी भीती काय होती

कॉमेडियन हर्ष गुजराल लवकरच ‘खतरों के खिलाडी १५’ या टीव्ही शोमध्ये दिसणार आहेत. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना हर्षने सांगितले की, त्याला खरी भीती उंचीची किंवा पाण्याची नव्हती, तर नोकरी सोडून पूर्णवेळ कॉमेडीमध्ये येण्याची होती. तो म्हणाला की, एका मध्यमवर्गीय मुलासाठी आपल्या आवडीचा पाठपुरावा करणे सोपे नसते. प्रश्न: ‘खतरों के खिलाडी’ बद्दल किती उत्सुकता आहे?…

Read More