Headlines

भूसंपादन:आरापूर एमआयडीसी, 16 दिवसांत जमिनीची 85 टक्केच मोजणी पूर्ण, 2013 च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना मिळणार मोबदला




प्रस्तावित आरापूर एमआयडीसीच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असली तरी १० दिवसांचे जमीन मोजणीचे टार्गेट असलेल्या आरापूर, गवळीशिवरा आणि सुलतानाबाद येथील ८५ टक्केच जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. या तीन गावांतून ७६२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. दहा महिन्यांपूर्वी अधिसूचना काढण्यात आल्यानंतर अखेर ६ मे रोजी मोजणीला सुरुवात झाली. प्रारंभीपासूनच सुलतानाबाद येथील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी विरोध केला होता. त्यामुळे प्रशासनाने येथील मोजणी पथकाकडून अन्य गावांतील मोजणी केली. शेंद्रा, वाळूज आणि बिडकीन येथील जागा आता संपल्याने मोठ्या उद्योगांची पावले आरापूरकडे वळणार आहेत. त्यामुळे या मोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आम्हाला दर किती मिळणार ही शेतकऱ्यांची प्रारंभीपासून मागणी होती. शासनाच्या दर निश्चित करणाऱ्या समितीने ठरवलेला दर शेतकऱ्यांना मान्य नसेल तर वाटाघाटीअंती दरनिश्चितीचा प्रस्ताव हा शासनाच्या हायपॉवर कमिटीकडे पाठवण्यात येणार आहे. या मोजणी पथकात एमआयडीसी, भूमी अभिलेख, महसूल, कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण ११३६ शेतकऱ्यांची जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. वाळूज, शेंद्र्यात जागा नसल्याने आरापूर एमआयडीसीला महत्त्व वाळूज आणि शेंद्रा येथे आता नवीन मोठ्या प्रकल्पांसाठी जागा शिल्लक नाही. अनेक नामांकित कंपन्या ‘वेटिंग’वर आहेत, त्यांना आरापूरमुळे हक्काची जागा मिळेल. याशिवाय वाळूज परिसरामध्ये असलेल्या मोठ्या उद्योगांच्या व्हेंडरचेनचा या भागात विस्तार होणे भौगोलिकदृष्ट्या सोयीस्कर ठरणार आहे. याशिवाय हे शहरालगत असल्याने वाहतूक आणि मनुष्यबळ उपलब्धतेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे आहे. या आठवड्यात मोजणी पूर्ण प्रस्तावित एमआयडीसीसाठी गेल्या काही दिवसांपासून मोजणी सुरु आहे. आरापूर, गवळीशिवरा व सुलतानाबाद येथील शनिवारपर्यंत ६५३.५७ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या आठवड्यात उर्वरित मोजणी पूर्ण करण्यात येईल. – अमित भामरे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या दरनिश्चित समितीने ठरवलेले सरासरी दर ठरवले आहेत. २०१३ च्या भूसंपादन कायद्याच्या कलम २६ ते ३० नुसार दरनिश्चितीची प्रक्रिया होत आहे. शेतकऱ्यांची जास्त मागणी असल्यास वाटाघाटींनंतर प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे पाठवण्यात येईल. – एकनाथ बंगाळे, उपविभागीय अधिकारी, वैजापूर आतापर्यंत झालेली मोजणी अशी
गावमोजणी झाली
गवळी शिवरा४१२.६१ हेक्टर
आरापूर१२२.७५ हेक्टर
गावमोजणी झाली
सुलतानाबाद११८.२१ हेक्टर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *