डंपरच्या चाकाखाली चिरडून कोल्हापूरचे दांपत्य जागीच ठार:अपघातानंतर पळणारा वसमतचा चालक पोलिसांच्या ताब्यात
भरधाव वेगातील रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून पती-पत्नी जागीच ठार झाले. हा हृदयद्रावक अपघात मंगळवारी (२३ जून) दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास पारनेर शिवारातील कन्हेर ओहोळ परिसरात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. भीमराव बंडू कांबळे (वय ३६) व गौरी भीमराव कांबळे (वय ३०,…