मनरेगा बचावासाठी शेतमजूर युनियनचे जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधरणे:व्हीबी ग्रामजी कायदा रद्द करून मनरेगा पुन्हा लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन (संलग्न भारतीय खेत मजदूर युनियन) अमरावती जिल्हा कौन्सिलच्या वतीने शेतमजुरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार २३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधरणे आंदोलन करण्यात आले. . या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतमजूर व महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यापूर्वी १५ ते २२ जूनदरम्यान संघटनेतर्फे ‘मनरेगा बचाव जनजागरण अभियान’ राबवण्यात आले…