Headlines

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण लवकरच:पंकजा मुंडेंची घोषणा; सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरणापेक्षा तिच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर देण्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या….

Read More

वीजग्राहकांना प्रॉम्प्ट, ऑनलाईन पेमेंटने 9.60 कोटींची सवलत:महावितरणच्या गो-ग्रीन आणि डिजिटल सेवांचा वापर वाढला

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजग्राहकांनी महावितरणच्या डिजिटल सेवांचा वापर करून मावळत्या आर्थिक वर्षात ९ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळवली आहे. प्रॉम्प्ट बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो-ग्रीन या पर्यायांचा वापर केल्याने ग्राहकांना हा लाभ मिळाला आहे. महावितरण ग्राहकांना विविध सवलती देते. यात, सात दिवसांच्या आत बिल भरल्यास बिल रकमेच्या (कर व शुल्क वगळून)…

Read More

गडकरी म्हणाले- 2004 पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते:गाड्यांचे नुकसान झाल्याचा पुरावा नाही, मायलेज रस्ते – ट्रॅफिकवर अवलंबून असते

देशात ई-20 पेट्रोल, इथेनॉल, मायलेज आणि गाड्यांवर होणाऱ्या त्याच्या परिणामांबद्दल सतत प्रश्न विचारले जात आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, इथेनॉलमुळे गाड्या खराब होतात याचा कोणताही पुरावा नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, पर्यायी इंधनामुळे देशाची तेल आयात कमी होईल, प्रदूषण…

Read More

दूध भेसळ प्रकरणावरून जयंत पाटील-सुरेश धस आमनेसामने:जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, उलटा फिरलो तर सोडणार नाही- धस

जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला नीट सोडणार नाही.मी सहज डिवचायचा माणूस नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडे चालवायची, इकडे नाही. तुम्हाला पाहून इतर लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटील यांना दिला आहे. आमदार सुरेश धस…

Read More

हॉटेल्स आणि मेन्यू कार्डवर 'चीज ॲनालॉग'चा उल्लेख आता बंधनकारक:मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कडक अंमलबजावणीचे निर्देश; 10 दिवसांत 1496 आस्थापनांची तपासणी

हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर ‘चीज ॲनालॉग’बाबत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना दिले आहेत. मंत्री…

Read More

कॉकरोच जनता पार्टीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल:CBI चौकशीची मागणी; पक्षाचे संस्थापक म्हणाले- इंस्टाग्राम खात्याचे नियंत्रण परत मिळाले

कॉकरोच जनता पार्टीविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. यामध्ये पक्षाच्या गतिविधींची CBI चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, संघटना सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी टिप्पणींचा गैरवापर करून त्यांचा व्यावसायिक फायदा घेत आहे. PIL मध्ये बनावट वकिलांच्या CBI चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. खरं तर, सरन्यायाधीशांनी (CJI)…

Read More

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी सिल्लोडमध्ये मातंग समाजाचा मोर्चा‎:लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा- सचिन साठे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकार घेत असलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ‘अ ब क ड’ निर्णयाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज तसेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सिल्लोड तालुका यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरण करण्यासंदर्भात १ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत. तसेच…

Read More

किरकोळ महागाई मार्चमध्ये वाढून 3.4% झाली:खाद्यपदार्थ महाग होण्याचा परिणाम; इराण युद्धामुळे हे आणखी वाढू शकते

मार्चमध्ये किरकोळ महागाई वाढून 3.4% वर पोहोचली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ती 3.21% होती. आज 13 एप्रिल रोजी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असताना महागाईमध्ये ही वाढ झाली आहे. युद्ध लांबले तर महागाई आणखी वाढू शकते. महागाई वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती वाढणे हे आहे. मार्चमध्ये…

Read More

लाडसावंगीत हुतात्मा काशीनाथ म्हस्के‎स्मारकाची दुरवस्था:प्रशासनाचे दुर्लक्ष‎, छताचे फॉल्स सीलिंग, लोखंडी चॅनल्स तुटले, परिसराचे विद्रुपीकरण

Marathi News Local Maharashtra Aurangabad The Poor Condition Of The Memorial Of Martyr Kashinath Mhaske In Ladsawangit; Neglect By The Administration, False Ceiling Of The Roof, Broken Iron Channels, Disfigurement Of The Area लाडसावंगी3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लाडसावंगी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सरकारकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र,…

Read More

माण नदी पाण्यासाठी 11 गावातील एक हजार शेतकऱ्यांचा अडीच तास:माण नदी पाण्यासाठी 11 गावातील एक हजार शेतकऱ्यांचा अडीच तास रास्ता रोको, यंदा धरणात साठा असूनही केवळ नियोजनाअभावी कोंडी

. रामचंद्र साळे ५ वर्षे आमदार होते, आमदार भालके १० वर्ष आमदार होते. या काळात कधीच पाणी कमी पडले नाही, त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी देखील तीन वर्षात पाणी कमी पडू दिले नाही, मात्र चालू वर्षी पाण्याचा साठा धरणात उपलब्ध असताना, या हंगामात नियोजनाच्या अभावामुळे पाणी सोडले नाही असे परखड मत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे…

Read More