.

रामचंद्र साळे ५ वर्षे आमदार होते, आमदार भालके १० वर्ष आमदार होते. या काळात कधीच पाणी कमी पडले नाही, त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी देखील तीन वर्षात पाणी कमी पडू दिले नाही, मात्र चालू वर्षी पाण्याचा साठा धरणात उपलब्ध असताना, या हंगामात नियोजनाच्या अभावामुळे पाणी सोडले नाही असे परखड मत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे (शरद जोशी) राज्य उपाध्यक्ष सिद्धेश्वर हेंबाडे यांनी व्यक्त केले. ते माण नदीत तात्काळ पाणी सोडा या मागणीसाठी माण संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले, ११ गावातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, त्याप्रसंगी मल्लेवाडी येथील चौकात बोलत होते.
सकाळी ९:३० रास्ता रोकोला सुरुवात झाल्यानंतर जवळपास ११:४५ पर्यंत हा रास्ता रोको सुरू होता. मल्लेवाडी चौकापासून पंढरपूर कडे सिद्धेवाडी हायस्कूल पर्यंत तर मल्लेवाडी चौकापासून ढेकळेवाडी पर्यंत जवळपास दोन किलोमीटर दुतर्फा रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर, गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.
पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार म्हणाले, आमची मागणी ही पूर्ण दाबाने नदीत पाणी सोडा हीच आहे. गेली १५ दिवस झाले, २५ तारीखपासून पाण्यासाठी पाठलाग सुरू आहे. अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून अधिकारी नेहमी बोटावर खेळवतात. वरून ४०० विसर्ग असताना देखील खाली पाणी येत नाही, अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. उजनीच्या मुख्य वितरिकेतून १४०० चा विसर्ग असून त्यापैकी साडेतीनशे उजव्याला येतो उर्वरित विसर्ग हा डाव्यात असून पूर्ण क्षमतेने हा विसर्ग वाढवल्यास माण नदीतून पाणी पुढे सरकोली पर्यंत जाईल अशी अपेक्षा व्यक्त
प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर- मंगळवेढा सीमेवरील माण नदीकाठच्या १७ गावांसाठी उजनी कालव्यातून दरवर्षी रोटेशननुसार पाणी सोडले जाते. मात्र, यंदा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही, असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने पाणी सोडावे, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. उजनीच्या कालव्यातून माण नदीला पाणी सोडले जाते. त्यातून माण नदीवरील बंधारे भरून घेण्यात येतात आणि या पाण्याचा लाभ माण नदीकाठच्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील १७ गावांना होतो. परंतु यंदा उन्हाळा संपत आला, उजनीचे उन्हाळी आवर्तन अंतिम टप्प्यात आले तरीही कालव्यातून पाणी सोडले नाही, त्यामुळे माण नदी कोरडी ठाक पडली आहे. नुकतीच खासदार प्रणिती शिंदे यानी सिद्धेवाडी येथील बंधाऱ्याची पाहणी केली. या गंभीर प्रश्नाबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली होती. त्यांनी उजनी कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट घटनास्थळी बोलावून घेतले आणि शेतकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत धारेवर धरले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. खासदार शिंदे यांनी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधीरवेद्र खांडेकर यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली. या पाहणी दौऱ्यावेळी भीमा कालवा मंडळाचे कार्यकारी अभियंता कथले, अभियंता पंडित, हळकुडे यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. व्यक्त केली. यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, सिद्धेवाडीचे सरपंच बाबा जाधव, संजय पवार, तरडगावचे बाळू गडदे, मुढवीचे बबन रोकडे मेजर, ढवळस येथील सिद्धेश्वर मोरे, पिंटू गोडसे यांच्यासह जवळपास १ हजार शेतकरी उपस्थित होते. आंदोलन सुरू झाल्यानंतर भीमा पाटबंधारे उपविभाग ५२ मंगळवेढ्याचे उपअभियंता हलकुडे यांना शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलनाची सूचना देऊन देखील दुर्लक्ष केले होते तसेच नियोजनात कमी पडल्यामुळे त्यांच्यावर आंदोलनकर्त्यांचा तीव्र संताप होता. त्यामुळे आंदोलन तीव्र होत असताना, भीमा पाटबंधारे व पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता कथले यांनी आंदोलन स्थळी येऊन, तात्काळ नियोजन लावले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. अधिकाऱ्यांनी नियोजन करून सायंकाळपर्यंत घरनिकीच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचवले. संजय पवार, दीपक जाधव, बबन रोकडे, विवेक चौगुले, सिद्धेश्वर मोरे, लक्ष्मण मोरे, सिद्धेश्वर हेंबाडे, मारुती मस्के, आदिनाथ शिंदे तसेच इतर १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल तुकाराम भिमराव कोळी यांनी दिली. आंदोलनादरम्यान लक्ष्मण मोरे यांच्या मालकीचे पिकअप वाहन (एमएच-०९ सीयू-६११०) रस्त्यावर आडवे उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला. तसेच वाहनावर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता विना परवाना (स्पीकर) ध्वनीक्षेपक यंत्रणा लावून घोषणाबाजी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
१७ गावातील शेतकरी संकटात सापडले यंदा रोटेशन चुकल्यामुळे भर उन्हाळ्यात गुंजेगाव, मारापूर, घरनिकी, मल्लेवाडी, शरदनगर, सिद्धेवाडी, ढवळस, धरणगाव, नेपतगाव, तावशी, गार अकोले, सरकोली, तनाळी, तपकीर शेटफळ, शंकरगाव, ओझेवाडी, मुडवी या गावांमधील नागरिक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ११ गावातील शेतकऱ्यांचा सहभाग माण संघर्ष समितीच्या या तीव्र रास्ता रोको आंदोलनात खालील गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये घरनिकी, चिचुंबे, मल्लेवाडी, सिद्धेवाडी. ढवळस, धर्मगाव, मुढवी, ओझेवाडी. नेपतगाव, तरडगाव.
नियोजन करून सायंकाळपर्यंत घरनिकी बंधाऱ्यात पोहोचले पाणी