Headlines

एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग:श्री माहेश्वरी मंडळ, बन्सीलाल नगर प्रभागातर्फे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दिंडी उत्साहात संपन्न




श्री माहेश्वरी मंडळ, बन्सीलाल नगर प्रभागातर्फे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आयोजित “एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग!” या विठ्ठल दिंडीचे आयोजन अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या दिंडीत सुमारे ५०० ते ७०० भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भगवान श्री विठ्ठलाच्या नामघोषाने, अभंग, भजन, टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, बालकांसह संपूर्ण कुटुंबांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिला. याप्रसंगी जिल्हा माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष श्री अजितजी नावंदर, श्री माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष श्री सुनीलजी मालानी, तसेच सचिव श्री अनिलजी बाहेती यांच्यासह जिल्हा माहेश्वरी मंडळ, श्री माहेश्वरी मंडळ आणि विविध प्रभागांतील अनेक पदाधिकारी व समाजबांधवांची प्रमुख उपस्थिती लाभली. दिंडीचा शुभारंभ गिरिजा माता मंदिरातून महाआरतीने करण्यात आला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनानंतर श्री माहेश्वरी मंडळ, वाळूज प्रभागातर्फे सर्व भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. तसेच भाविकांच्या सोयीसाठी परतीच्या प्रवासाकरिता बससेवेचीही व्यवस्था करण्यात आली. हा संपूर्ण उपक्रम प्रभाग प्रमुख श्री देवेन लड्डा व सचिव श्री अनुप डोडिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रकल्प प्रमुख, दिंडी प्रतिनिधी, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांच्या सामूहिक सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, वाळूज प्रभाग तसेच सहभागी भाविकांचे श्री माहेश्वरी मंडळ, बन्सीलाल नगर प्रभागातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. भविष्यातही अशाच धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *