Headlines

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी सिल्लोडमध्ये मातंग समाजाचा मोर्चा‎:लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा- सचिन साठे




सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकार घेत असलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ‘अ ब क ड’ निर्णयाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज तसेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सिल्लोड तालुका यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरण करण्यासंदर्भात १ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत. तसेच राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या बदर समितीनेसुद्धा त्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय जाहीर करावा व त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशी मागणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू तथा एबीएस क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांनी मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र सरकाला केली आहे. या वेळी सकल मातंग समाज तसेच आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सिल्लोड तालुका यांच्या वतीने सिल्लोडच्या तहसिलदार अंकिता ताकभाते यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या वेळी लहुजी क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, सखाराम अहिरे, अंबादास सगट, कैलास पाजगे, राजू भालेराव, लहुजी क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी मोर्चाला संबोधित केले. मोर्चाचे सूत्रसंचालन फकीरचंद तांबे यांनी केले तर आभार विजय खाजेकर यांनी मानले. या वेळी कमल घाडगे, सुवर्णा साबळे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनवणे, विष्णू सोनवणे, नामदेव खेत्रे, सोमिनाथ भालेराव, सुधाकर कासारे, विनायक वाघुले, संजय कांबळे, सागर खेत्रे, संजय अहिरे, कैलास खरात, समाधान गायकवाड आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *