![]()
दिंडोरी परिसरातील वाढत्या वीज भारनियमनामुळे हैराण झालेल्या विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीच्या कार्यालयात जात रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत अनोखे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी कार्यालयातच अभ्यास केला. अखेर, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर बोलून भारनियमन रद्द करण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. निळवंडी रस्त्यावरील जाधव वस्ती, पिंगळे वस्ती, बोरस्ते वस्ती आणि हरीक महाले वस्ती परिसरात सध्या रात्रीच्या वेळी बिबट्यांचा वावर वाढला आहे. वीज नसल्यामुळे बिबट्याचा अंदाज येत नाही, परिणामी, शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देणे आणि नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यातच दररोज वीज गुल होत असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासही बुडत होता. या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी वीज कार्यालयातच एक तास अभ्यास करत ठिय्या मांडला. यावेळी नगरसेवक नितीन गांगुर्डे, लखन पिंगळ, विजय पिंगळ यांच्यासह ग्रामस्थांनी उपअभियंता नागरे यांच्याकडे व्यथा मांडली. माजी आमदार धनराज महाले यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. शुक्रवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता प्रांत कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे दिंडोरीकरांनी जाहीर केले. अखेर, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर बोलून भारनियमन रद्द करण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात योगेश पिंगळे, चंद्रकांत पाटील, विलास पिंगळ, शुभम पिंगळ, सुनील घुटे आदी उपस्थित होते. भारनियमनामुळे पिकांना पाणी देणेही कठीण दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे आहे, वीज वितरण कंपनीने केलेल्या भारनियमनामुळे पिकांना पाणी देणे ही कठीण होत आहे, शिवाय बिबट्याचे परिसरात रोज दर्शन होत आहे, त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करावा. – रामभाऊ जाधव, शेतकरी.
Source link
भारनियमनामुळे विद्यार्थ्यांचा रात्री वीज कार्यालयात अभ्यास:रात्रीचे भारनियमन त्यात बिबट्याची दहशत; दिंडाेरीचे नागरिक व विद्यार्थी त्रस्त