पावसाचा रेड अलर्ट अन् मुंबई-पुणे मार्ग ठप्प:दरड कोसळल्याने वाहतूक स्थगित; मंत्री गिरीश महाजन म्हणाले- पर्यटनाचा मोह टाळा
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली असून, मुंबईत पर्यटनासाठी येऊ नका, अन्यथा सक्तीची पावले उचलावी लागतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. मुंबई-पुणे…