Headlines

उन्हाळी सुट्ट्यांसाठी पर्यटकांची पावले अहिल्यानगरकडे:भाैगाेलिक-धार्मिक पयर्टनाला प्राधान्य,महिनाभरात 5 लाखांहून अधिक पर्यटक येण्याचा अंदाज‎



एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही अहिल्यानगर जिल्ह्याला पर्यटनाचे वेध लागले आहेत. यंदा शाळा-महाविद्यालयांच् या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ २० ते ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे चित्र आहे. महसूल आणि पर्यटन विभा

.

जिल्ह्यातील भंडारदरा हे उन्हाळ्यासाठी मुख्य आकर्षण ठरत असून, येथील रिसॉर्ट्सचे बुकिंग सध्या ७५ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. प्रवरा नदीवरील जलाशय आणि निसर्गरम्य वातावरणामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकमधील पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत आहेत. तसेच, कळसूबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड या परिसरात दर आठवड्याला ५ हजारांहून अधिक ट्रेकर्स भेट देत आहेत.

धार्मिक पर्यटनाचा विचार करता, शिर्डीत दररोज सरासरी ५० ते ६० हजार भाविक दर्शनासाठी येतात, ही संख्या मे महिन्यात १ लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे. शहराच्या जवळ असलेल्या चांदबीबी महाल येथेही दररोज संध्याकाळी २ ते ३ हजार नागरिक भेट देत आहेत. उंचावर असलेल्या या ठिकाणाहून मिळणारा थंड वारा पर्यटकांना दिलासा देत आहे.

याशिवाय नगर शहरापासून जवळच असलेले रणगाडा संग्रहालय देखील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. या वाढत्या पर्यटनामुळे जिल्ह्यातील हॉटेल आणि ट्रॅव्हल्स व्यवसायात सुमारे १५ ते २० कोटींची उलाढाल अपेक्षित असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. जिल्ह्याचे हवामान पर्यटकांना पोषक जिल्ह्यात उन्हाळा कडक असला तरी भंडारदरा आणि कळसूबाईचा परिसर उंचावर असल्याने येथील तापमान इतर भागांच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी कमी असते. नगर शहरालगतचा डोंगरदरांचा भाग संध्याकाळच्या वेळी अतिशय थंड आणि प्रसन्न असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत कौटुंबिक मुक्कामासाठी आणि मानसिक शांततेसाठी येथील वातावरण पर्यटकांना अधिक योग्य वाटते.

सोयीसुविधांकडे लक्ष हवे ^अहिल्यानगरमधील पर्यटन स्थळे उन्हाळ्यात मनाला उभारी देतात, मात्र वाढती गर्दी पाहता प्रशासनाने पार्किंग, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचे नियोजन करणे गरजेचे आहे. विशेषतः घाटांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त नेमावा. जेणेकरुन पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल. – जयंत येलुलकर , पर्यटनप्रेमी नगर मध्यवर्ती ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच वेळी निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. भंडारदरा सारखी थंड हवेची ठिकाणे, शिर्डीसारखी जागतिक दर्जाची धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक किल्ल्यांमुळे सर्व प्रकारच्या पर्यटकांच्या आवडीनिवडी येथे पूर्ण होतात. तसेच रस्त्यांच्या जाळ्यामुळे मुंबई-पुण्यापासून असलेले सुलभ अंतर हे पर्यटनाच्या वाढीचे मुख्य कारण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *