संभाजीनगरात ४०० आठवड्यांपासून अधिकारी, डाॅक्टर, वकिलांचे श्रमदान:दर रविवारी 2 तासांच्या स्वच्छता मोहिमेतून बदलला शहराचा चेहरामाेहरा
‘केवळ कर भरणे म्हणजे नागरिकांचे कर्तव्य संपत नाही, तर शहराप्रति आपलेही काही देणे लागते,’ या जाणिवेतून शहरात सुरू झालेली स्वच्छता मोहीम आता एक आदर्श लोकचळवळ बनली आहे. २७ ऑक्टोबर २०१६ रोजी उद्योजक सुनील किर्दक, विंग कमांडर टी. आर. जाधव आणि मानसिंग पवार यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी राहिली. मराठा समाज प्रतिष्ठानच्या वसतिगृहातील अवघ्या १५० ग्रामीण…