‘लिंकिंग', कर्ज नाकारणाऱ्यांवर कारवाई:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बँका आणि खत कंपन्यांना कडक इशारा
खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर आला असून यंदा काही महत्त्वाच्या रासायनिक खतांची प्रचंड टंचाई सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या खत किंवा बियाण्यांच्या विक्रीच्या वेळी विक्रेत्यांकडून ‘लिंकिंग’ (मुख्य खतासोबत दुसरे नको असलेले उत्पादन घेण्याची सक्ती) केले जाते. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत, लिंकिंग करण्यास बाध्य करणाऱ्या उत्पादक कंपन्या तसेच…