![]()
दलित वस्तीमधील विकासकामे रखडल्याच्या निषेधार्थ रिपाइं (आठवले) गटाच्या वतीने कुर्डुवाडी नगरपालिकेवर ‘हलगी मोर्चा’ काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. रिपाइं (आ) माढा तालुका युवाध्यक्ष आकाश जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र, नगरपालिकेत निवेदन स्वीकारण्यासाठी सक्षम अधिकारी हजर नसल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त करत आपला मोर्चा पोलिस ठाण्याकडे वळवला. कुर्डुवाडी शहरातील दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सोयी- सुविधा आणि विकासकामांची दुरवस्था झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत रिपाइं कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि.१४ रोजी नगरपालिकेवर धडक दिली. मोर्चा नगरपालिकेत पोहोचल्यानंतर मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. शिवाय कार्यालयात दोन शिपायां खेरीज कोणी नव्हते. पोलिसांनी मुख्याधिकारी यांना फोन करुन आंदोलनाची तीव्रता समजावून सांगितल्यानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी अन्य एका कर्मचाऱ्याला घरुन बोलावण्यात आले. मात्र सदर निवेदन स्वीकारण्यास सक्षम अधिकारी नसल्याचे सांगत आकाश जगताप यांनी त्या अधिकाऱ्याला निवेदन देण्यास नकार दिला व प्रशासनाच्या या भूमिकेचा तीव्र निषेध केला. पोलिस ठाण्यातील चर्चेनंतर सर्व आंदोलक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा झाले. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे विकासकामे खोळंबली असून, गरिबांच्या हक्काचा पैसा कुठे जातोय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी बोलताना आकाश जगताप म्हणाले की, आजचा मोर्चा ही केवळ सुरुवात होती. जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर आगामी काळात यापेक्षाही वेगळ्या आणि अधिक आक्रमक स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. निवेदन न देताच आंदोलनाचा नगरपालिका प्रशासनाच्या या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट कुर्डुवाडी पोलीस ठाणे गाठले. दलित वस्तीतील कामांबाबत टाळाटाळ करणाऱ्या आणि आंदोलनाची दखल न घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जगताप यांनी लावून धरली. यावेळी पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. समोरोप केला. यावेळी पो.उपनिरीक्षक स्वामीनाथ लोंढे, सोलंकर उपस्थित होते. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी नगरसेवक जगन्नाथ क्षीरसागर, साबीर चाऊस, संदीप भोसले आदी उपस्थित होते. गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली
Source link
कुर्डुवाडी नगरपालिकेवर ‘हलगी मोर्चा’:दलित वस्तीत विकासकामे रखडल्याने रिपाइं (आ) कडून निदर्शने