Headlines

Security shield against missiles with a range of 2 to 5 thousand km, India now in line with America-Russia


  • Marathi News
  • National
  • Security Shield Against Missiles With A Range Of 2 To 5 Thousand Km, India Now In Line With America Russia

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पाक चीनकडून वाढत्या क्षेपणास्त्र धोक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण (बीएमडी) क्षमता सिद्ध केली आहे. भारत आता दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना वातावरणाच्या आत व बाहेर दोन्ही स्तरांवर पाडण्यास सक्षम असल्याचे डीआरडीओने दाखवून दिले आहे. यासाठी बुधवार १० जून व गुरुवार, ११ जून रोजी २४ तासांच्या आत सलग ३ यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.

चाचणीत वापरलेली इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे २ हजार ते ५ हजार किमी पल्ल्याच्या शत्रूच्या क्षेपणास्त्र भेदू शकतात. भारताच्या स्वदेशी आयर्न डोमच्या दिशेने हे महत्त्वाचे यश मानले जात आहे. संरक्षण मंत्रालयानुसार, यामुळे भारत आता अमेरिका, रशिया व इस्रायलसारख्या प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला. दरम्यान, नौदलाने मध्यम पल्ल्याच्या अँटी-शिप क्षेपणास्त्र एनएएसएम-एमआरची पहिली चाचणी घेतली.

वातावरणात, अवकाशातही नष्ट केली क्षेपणास्त्रे

  • बीएमडी प्रणालीमध्ये रडार लक्ष्याची ओळख पटवते. त्यानंतर कमांड सेंटर त्याचा मागोवा घेते. इंटरसेप्टर लाँच केले जाते आणि शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करते.
  • १०० किमी उंचीपर्यंत एंडो-ॲटमॉस्फेरिक आणि त्यावरील अवकाशासाठी एक्सो-ॲटमॉस्फेरिक सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे.
  • पाकिस्तान फतेह-१, फतेह-२ आणि इतर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर काम करत आहे. त्यामुळे भारत आपली बीएमडी प्रणाली मजबूत करत आहे.
  • हे यश महत्त्वाचे आहे, कारण यामुळे अण्वस्त्र हल्ल्यांपासून संरक्षण मिळेल. तसेच लष्करी तळांचे रक्षण होईल आणि शत्रूचे लांब पल्ल्याचे हल्ले निष्प्रभावी करण्यात मदत होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *