Headlines

‘काॅमेडी शो’मध्ये अश्लील विनोद:डॉ. सेजल पवारवर 15 दिवसांची बंदी, केईएम रुग्णालय प्रशासनाची कारवाई; चौकशीसाठी समिती स्थापन




स्टँडअप कॉमेडी शोमध्ये देहदान केलेल्या मृतदेहाच्या खासगी अंगाबाबत अश्लील विनोद करणारी केईएम रुग्णालयाची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिला केईएम प्रशासनाने १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. या काळात तिला महाविद्यालय, रुग्णालय आणि वसतिगृहात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच केईएमने चौकशीसाठी ५ सदस्यीय समिती नेमली. समिती ७ दिवसांत अहवाल सादर करेल. प्रणीत मोरेचा स्टँडअप कॉमेडी शो एका तरुणाने ३७० रुपयांच्या बिर्याणी व तरुणीसोबतच्या वर्तनाबाबत केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. वादानंतर या तरुणाला कंपनीने कामावरून काढले. अशातच, डॉ. सेजल हिचाही काही दिवसांपूर्वीचा शोमधील वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हशा मिळवण्याच्या नादात अडकली डॉक्टर डॉ. सेजल पवारचा वादग्रस्त व्हिडिओ सुमारे दोन महिन्यांपूर्वीचा आहे. शोदरम्यान प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून ती वाहवत गेली आणि अत्यंत आक्षेपार्ह विधान करून बसली. २ महिन्यांनंतर यावरून इतका मोठा वाद निर्माण होईल याची तिला कल्पना नव्हती, असे तिचे म्हणणे आहे. कॉमेडियन प्रणीत मोरे यानेही जाहीर माफी मागितली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *