Headlines

Vijay Wadettiwar Slams Government Over Jantar Mantar Student Lathicharge


दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकार

.

पुढे बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले की, देशाचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करणे हे कोणत्याही लोकशाहीला शोभणारे नाही. सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला असून, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवर न्याय, हक्क आणि विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज हा लोकशाहीवरील काळा डाग असल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. आंदोलकांवर बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारालाच आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी, पिकांना न मिळणारा हमीभाव, वाढती उत्पादनखर्चाची समस्या, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील विलंब आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांची दुरवस्था याकडे लक्ष वेधले. “सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकरी संकटात आहे, विद्यार्थी भविष्याबाबत चिंतेत आहे, तर बेरोजगार युवक रोजगारासाठी भटकत आहे. मात्र सरकारला या प्रश्नांपेक्षा प्रसिद्धीची अधिक चिंता आहे,” असा आरोप त्यांनी केला.

आमदार वडेट्टीवार यांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्यात यावेत. अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर जनआंदोलन उभारून सरकारला जनतेच्या न्याय्य मागण्या मान्य करण्यास भाग पाडेल.

या निषेध आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच दिल्लीतील जंतर-मंतरवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

हे ही वाचा…

जंतर-मंतरवर आंदोलनाचे 4 दिवस, 12 व्हायरल व्हिडिओ:देशभरातून लोक अन्न-पाणी, सॅनिटरी पॅड्स पाठवत आहेत; पोलिसांचा लाठीचार्ज, मुलांनी फुले उधळली

कॉकरोच जनता पार्टी पेपरफुटीच्या विरोधात 20 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. त्यांचे समर्थक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. 20 जुलै रोजी संसद मार्चनंतर हे आंदोलन तीव्र झाले आहे. 20 जुलै ते 23 जुलैपर्यंत म्हणजे चार दिवसांत येथे जे काही घडले, त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सविस्तर वाचा…

विद्यार्थी आंदोलनात देशविरोधी घोषणा का?:देशहिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत, त्यांनी आपल्या उंचीनुसार बोलावे – नीतेश राणे

राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधत, “देशहिताच्या आणि तरुणांच्या हिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत,” अशी टीका केली. नीट परीक्षा आणि त्यावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर आरोप करत केंद्र सरकार परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पावले उचलत असल्याचा दावा केला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.