![]()
अचलपूर शहरातील सरमसपूरा निवासी सुरेशराव ताराचंद पाटस्कर यांनी मरणोत्तर देहदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरले आहे. पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हा संकल्प केला असून, यामुळे समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. समाजकार्याची आवड जपणारे सुरेशराव पाटस्कर यांनी ‘मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देणं लागतं’ या भावनेतून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसह सुनबाई उपस्थित होत्या. पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या मुला-मुलींनीही या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. पुनर्जीवन फाउंडेशन गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अवयवदान व देहदानाबाबत जनजागृती करत आहे. संस्थेच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत एक हजारांहून अधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे, तर १५ ते २० जणांनी प्रत्यक्ष देहदानही केले आहे. या चळवळीत पुनर्जीवन फाउंडेशनचे ज्येष्ठ पदाधिकारी विश्राम कुलकर्णी, राम तिवारी, जितेंद्र रोडे, डॉ. राजेश उभाड, डॉ. संदीप चौधरी, विनोद नागे, राजा पिंजरकर, प्रमोद डेरे, ॲड. प्रशांत गाठे, अक्षय जनवारे सक्रिय सहभागी आहेत. याप्रसंगी अमृता मंगेश पाटस्कर, अनिल चव्हाण आणि ओम चरोडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. संस्थेने ‘ब्रेन डेड’ रुग्णांचे अवयव ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून अनेकांना जीवदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर सुरेशराव पाटस्कर यांच्या या देहदानाच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Source link
अचलपूर येथील पाटस्करांचा देहदानाचा संकल्प:पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार