Headlines

अनावरण:पैठणला अण्णा भाऊ साठे यांच्या 12.5 फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण




साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर पैठण शहरात शनिवारी झाला. मातंग समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला मूर्त रूप देत शहरात उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दिमाखात अनावरण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास आमदार विलास भुमरे, नगराध्यक्ष विद्याभूषण कावसानकर, विनोद बोंबले, नंदुअण्णा काळे, भूषण कावसानकर, तुषार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अनावरणापूर्वी सायंकाळी पाच वाजता सह्याद्री चौकातून अण्णा भाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, वाद्यांचा निनाद आणि अण्णा भाऊंच्या जयघोषाने शहरातील वातावरण भारावून गेले. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. या वेळी नागरिक, समाजबांधव, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले. खासदार संदिपान भुमरे यांच्या संकल्पनेतून पुतळ्याची थीम साकारण्यात आली असून शिल्पकार नरेंद्र सोळुंके यांनी जवळपास वर्षभर अथक परिश्रम घेऊन हा भव्य पुतळा साकारला आहे. पुतळ्याची उंची १२.५ फूट असून परिसराच्या सुशोभीकरणासह संरक्षण भिंत, भव्य कमान, चबुतरा, सामाजिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त स्टेज आणि बालकांसाठी खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले आहे. या वेळी दादा बारे, जितुभाऊ परदेशी, बजरंग लिंबोरे, अप्पासाहेब निर्मळ, शेखर शिंदे, किशोर चौधरी, जालिंदर आडसूळ, अनिकेत धारकर, जिजा प्रव्हाणे यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. स्मारकापेक्षा विचारांचा वारसा महत्त्वाचा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हा केवळ स्मारक नसून संघर्ष, स्वाभिमान, समता आणि सामाजिक न्यायाचा प्रेरणास्तंभ आहे. अण्णा भाऊंचे साहित्य व सामाजिक विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी खासदार संदिपान भुमरे यांनी सांगितले, यावेळी आमदार विलास भुमरे यांनी देखील अण्णा भाऊ साठे यांच्या विचाराचे वारसा आपण पुढे घेऊन जाऊ शहरात या पुतळ्याच्या माध्यमातून नवीन प्रेरणा मिळेल असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील मातंग समाजातील युवक सह गणेश वडागळे,रावसाहेब नाडे,नामदेव खरात, सतीश अंधाळे, ज्ञानेश्वर गायके,सर्व नगरसेवकसह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *