![]()
‘भारतीय रसायनशास्त्राचे जनक’ आणि महान रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुल्लचंद्र (पी. सी.) रे यांनी ‘बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ या भारतातील पहिल्या औषध कंपनीची स्थापना करून भारतीय औषध उद्योगाचा पाया रचला व स्वदेशी उद्योगाला दिशा दिली. विज्ञान, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या भावनेतून वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची आवड जोपासावी, असे आवाहन श्रीमान सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर उपासनी यांनी केले. एसएनजेबी संचलित श्रीमान सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयात सर प्रफुल्लचंद्र (पी. सी.) रे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात डॉ. उपासनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर पी. सी. रे यांच्या विज्ञान, संशोधन व शिक्षण क्षेत्रातील कार्याची सविस्तर माहिती देत भारतीय औषध उद्योगातील त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे विभागप्रमुख डॉ. व्ही. ए. चटपल्लीवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी डॉ. एच. व्ही. शहारे, बी. बी. अमृते यांच्यासह तृतीय वर्ष बी. फार्मचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा पाटारे यांनी केले. संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी तसेच संस्थेच्या विश्वस्त व प्रबंध समितीच्या सदस्यांनी मार्गदर्शन केले.
Source link
विद्यार्थ्यांनी संशोधनाची आवड जोपासणे आवश्यक:चांदवड येथे डॉ. चंद्रशेखर उपासनी यांचे आवाहन