![]()
शहरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा न्यायालयासमोर पार्क केलेली स्कोडा कार रविवारी (१६ जुलै) पेटवून दिली. विशेष म्हणजे एका तरुणानेच संतापाच्या भरात स्वत:च्याच कारला आग लावली असून त्याने या कृत्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिस ३ दिवसांपासून दंडाची पावती देत नाहीत आणि कारही देत नसल्याचा आरोप या तरुणाने व्हिडिओमध्ये केला आहे. “प्रशासन, मनपा आणि वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईचा दंड भरून कार द्यावी यासाठी ३ दिवसांपासून टाळाटाळ करत आहेत. त्यांच्या या दिरंगाईच्या निषेधार्थ मीच ही गाडी पेटवून देत आहे,’ असा संताप तो या व्हिडिओतून व्यक्त करत आहे. छावणी वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. १४ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचा शहरात दौरा होता. सकाळी ११ वाजता सेशन कोर्टासमोरील मार्गावर ही विनाक्रमांकाची स्कोडा कार उभी असल्याचे पोलिसांना आढळले. पीए सिस्टिमद्वारे वारंवार सूचना देऊनही कोणीही मालक समोर आला नाही. इनसाइड स्टोरी: डिस्क ब्रेकमुळे कार बाजूला करता आली नाही कारवाई केलेल्या कारला नंबर नाही व काचा काळ्या आहेत. कारला डिस्क ब्रेक असल्याने मनपाच्या क्रेनला ती टोइंग करून बाजूला करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी या कारला जॅमर लावले होते. तेव्हापासून ही कार तेथेच उभी होती.
Source link
दंडाची पावती नाही:कारला 3 दिवसांपासून जॅमर; तरुणाने वैतागून स्वत:ची कार पेटवली, संभाजीनगरमधील व्हिडिओ व्हायरल