![]()
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या काहीही काम उरलेले नाही, त्यामुळे केवळ मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत,” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या निवडणूक प्रक्रियेवरील टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. “गोपीनाथ मुंडे हे आमचे सर्वोच्च नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे हे आमचे सर्वोच्च नेते होते आणि भाजपने त्यांना नेहमीच सर्वोच्च सन्मान दिला. जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नसते. मात्र, जे व्यक्ती आज हयात नाहीत, त्यांच्याबद्दल मीडियासमोर अशी विधाने करणे आणि अशा घटनांना गालबोट लावणे हे अत्यंत चुकीचे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे समजून घ्यायला हवे. तसेच, काँग्रेसच्या किती लोकांनी किती जणांचा जीव घेतला, हेदेखील चव्हाणांनी तपासून पाहावे,” असा टोला त्यांनी लगावला. माजी शिक्षणमंत्र्यांच्या आश्रमशाळेची गंभीर दखल राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या मारेगाव येथील ‘चिंधुजी पुरके आदिवासी आश्रमशाळेत’ विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा मुद्दा समोर आला आहे. येथे खिडक्यांना जाळ्या नाहीत, स्वच्छतागृहांमध्ये वीज नाही आणि काहींना तर दरवाजेही नाहीत. यावर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “वसंतराव पुरके भाजपचे विरोधक आहेत म्हणून मी बोलत नाही, पण आश्रमशाळेत मुला-मुलींच्या शौचालयाला दरवाजे नसणे, ही आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी अवहेलना आहे. मी या विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्याशी स्वतः बोलेन आणि या प्रकरणाची पुन्हा तपासणी केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. रोहित पवारांना सुनावले खडेबोल निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेलाही बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिले. “निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त यंत्रणेविरुद्ध बोलणे हे थेट संविधानाच्या विरोधात बोलण्यासारखे आहे. रोहित पवारांनी आपला खोटारडेपणा सोडून द्यावा आणि असे नकारात्मक वातावरण तयार करू नये,” असे ते म्हणाले. प्रत्येक पक्षाचे बूथ लेव्हल एजंट (BLA) असतात, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, जेणेकरून एकाही मतदाराचे नाव सुटणार नाही, याकडे लक्ष देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. राजस्थान निवडणुकीची जबाबदारी सध्या चंद्रशेखर बावनकुळे हे राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. जयपूरमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि नगरपालिका निवडणुकांसाठी त्यांच्यावर ‘सहप्रभारी’ म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या दौऱ्यात आपल्यावर नेमकी काय जबाबदारी असेल, हे आजच्या बैठकीत स्पष्ट होईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली. हेही वाचा.. मुंबई हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत महाराष्ट्रभर तांत्रिक गोंधळ:अभिजित दिपकेंचा सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम, संतापानंतर हायकोर्टाकडून गंभीर दखल
मुंबई हायकोर्टाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत रविवारी महाराष्ट्रभर मोठा तांत्रिक गोंधळ उडाला. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीने नादुरुस्त कीबोर्ड दिले. तसेच सर्व्हर डाऊन आणि पेपर आपोआप सबमिट होणे, असे प्रकार घडले. यामुळे संतप्त उमेदवारांनी संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रांबाहेर ठिय्या आंदोलन केले. या प्रकाराची हायककोर्टाच्या रजिस्ट्रारनेही दखल घेतली असून पुढील कार्यवाहीबाबत कळवले जाईल, अशी नोटीस जारी केली आहे. सविस्तर वाचा
Source link
पृथ्वीराज चव्हाणांना सध्या काही काम नाही:चर्चेत राहण्यासाठीच त्यांची धडपड; गोपीनाथ मुंडेंवरील दाव्यावरून बावनकुळे संतापले, रोहित पवारांवरही निशाणा