![]()
पवित्र श्रावण महिना आणि त्यातच श्रावणी सोमवारचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवमंदिरे ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमून गेली आहेत. राज्यासह देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज महादेवाच्या दर्शनासाठी राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी केली आहे. पहाटेपासूनच सुरू असलेल्या महापूजेमुळे आणि गाभाऱ्यात केलेल्या मनमोहक सजावटीमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मांदियाळी; रात्रीपासूनच रांगा नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांचा अलोट सागर उसळला आहे. श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व असल्याने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रविवारी रात्रीपासूनच दर्शन रांगेत उभे राहणे पसंत केले आहे. मराठवाड्यातील ज्योतिर्लिंगांवरही भाविकांची मोठी गर्दी मराठवाड्यातील प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणीही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि छत्रपती संभाजीनगर जवळील घृष्णेश्वर महादेव मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. प्रशासनाकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावणी सोमवारनिमित्त भंडाऱ्यात भैरंगेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी श्रावण सोमवारनिमित्त ऐतिहासिक श्री भैरंगेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. भगवान शिवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मनोभावे पूजा-अर्चना करत शिवलिंगावर दूधाचा अभिषेक केला. मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास श्रावणी सोमवारनिमित्त सर्वच प्रमुख शिवमंदिरांच्या गाभाऱ्यात आज विशेष आणि आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. महादेवाची पिंड विविध रंगीबेरंगी फुले आणि बेलाच्या पानांनी सजवण्यात आली असून, हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांचे डोळे दिपून जात आहेत. नागपंचमी आणि श्रावणी सोमवारनिमित्त मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
मुंबईतील प्रसिद्ध श्री बाबुलनाथ मंदिरात नागपंचमी आणि श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले असून, भक्तांनी भगवान शिवाची मनोभावे पूजा-अर्चना करत अभिषेक केला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. श्रावणी सोमवारनिमित्त तुंगारेश्वर महादेव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी वसईतील डोंगरावर वसलेल्या प्रसिद्ध तुंगारेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. महादेवाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, ‘हर हर महादेव’ आणि ‘बोल बम’च्या जयघोषात भाविक दर्शनासाठी पुढे सरकत आहेत. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हेही वाचा.. श्रावणातील पहिल्या सोमवारी घ्या महाकालाचे व्हर्च्युअल दर्शन:जल-पंचामृत अभिषेक, बिल्वपत्र – नैवेद्य अर्पण आणि संपूर्ण आरती करा हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी श्रावण मासाची ख्याती आहे. भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारी महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. याच कारणामुळे भारतातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्यासाठी या दिवशी भाविकांची गर्दी होते. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी दिव्य मराठी आपल्या वाचकांसाठी घरबसल्या महाकाल ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि अभिषेक करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी दिव्य मराठी खास व्हर्च्युअल दर्शन घेऊन आले आहे. येथे क्लिक करून दर्शनाचा लाभ घ्या…
Source link
श्रावणी सोमवारचा उत्साह:त्र्यंबकेश्वर ते घृष्णेश्वर… महादेवाच्या मंदिरांत भाविकांची मांदियाळी; रात्रीपासूनच रांगा, आकर्षक फुलांच्या सजावटीचे पाहा खास व्हिडीओ