![]()
लाडगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. राहुल जगन्नाथ लिहिणार (३५, रा. लाडगाव रोड, वैजापूर) असे मृताचे नाव आहे.राहुल लिहिणार हे दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची धडक झाली. अपघातात लिहिणार यांच्यासह चंद्रप्रकाश प्रजापती व सोमनाथ प्रेमदास प्रजापती हे जखमी झाले. नागरिकांनी तिघांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान राहुल लिहिणार यांचा मृत्यू झाला.
Source link
लाडगाव रोडवर दुचाकींची धडक:एक ठार, दोन जखमी