![]()
अमरावती-अकोला महामार्गावर लोणी परिसरात मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने रस्ता दुभाजक ओलांडून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात अमरावतीतील निवृत्त अधिकारी आणि उद्योजक किशोर काकाणी (58) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. नेमका अपघात कसा घडला? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास किशोर काकाणी हे आपल्या मूळ गावाहून म्हणजेच कामरगावहून अमरावतीकडे परतत होते. प्रवासादरम्यान त्यांनी लोणी परिसरातील ‘हॉटेल संधू’जवळ आपली कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. नेमक्या याचवेळी अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या अनियंत्रित ट्रकने वेगातच रस्ता दुभाजक तोडला आणि थेट किशोर काकाणी यांच्या उभ्या असलेल्या कारवर जाऊन धडकला. कारचा चेंदामेंदा, पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, काकाणी यांच्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या जोरदार धडकेत किशोर काकाणी यांचा घटनास्थळीच प्राणज्योत मालवली. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, त्यांचा मृतदेह पूर्णपणे चेपल्या गेलेल्या कारमध्येच अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून काकाणी यांचा मृतदेह कारच्या बाहेर काढण्यात यश आले. अमरावतीत हळहळ किशोर काकाणी हे अमरावतीतील दसरा मैदान जवळील बियाणी कॉलेज परिसरात वास्तव्याला होते. एका प्रस्थापित आणि मनमिळाऊ उद्योजकावर अचानक काळाने असा घाला घातल्यामुळे अमरावतीच्या व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या चालकावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. हेही वाचा.. पुण्यात खड्ड्याने 11 वर्षांच्या ऋषभचा जीव घेतला: दुचाकी घसरली अन् मागून आलेल्या ट्रकखाली चिरडला रस्त्यांवरील खड्डे आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे. पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 11 वर्षीय ऋषभ संदीप पाटोळे याचा जागीच मृत्यू झाला. वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकी घसरली. त्यानंतर रस्त्यावर पडलेला ऋषभ मागून येणाऱ्या आयशर ट्रकच्या चाकाखाली आला. या दुर्घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. सविस्तर वाचा
Source link
अमरावती-अकोला महामार्गावर थरार:भरधाव ट्रकने दुभाजक ओलांडून कारला चिरडले; प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू