![]()
पतीच्या दीर्घायुष्यासाठी महत्त्वाची मानलीजाणारी वटसावित्री पौर्णिमा सोमवारी साजरीहोणार आहे. यंदा पहाटे ३.०७ पासून दुपारी४.१७ वाजेपर्यंत भद्रा काळ आहे. तरीज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला येणारा भद्रादोष मानला जात नाही. हा काळ वर्ज्य नाही.त्यामुळे पूजेसाठी सकाळी तीन तास आणिसायंकाळी साडेतीन तास असा साडेसहातासांचा विशेष पुण्यपर्वकाळ आहे. हिंदू धर्मात वटवृक्षाला शिवस्वरूप मानूनब्रह्म, सावित्री आणि वटवृक्षाच्या पूजनाचीप्राचीन परंपरा आहे. वटवृक्ष हापर्यावरणाचा समतोल राखणारा,ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे. वाढत्याशहरीकरणात मात्र वटवृक्षांची संख्या कमीझाली. त्यामुळे सत्यवान-सावित्रीची कथाश्रवण करून पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते,अशी भाविकांची श्रद्धा आहे. दिवसभरउपवास करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी तोसोडतात. पूजनविधी, मंत्रपठण : पूजनात सुपारीच्या गणपतीचीस्थापना करावी. त्यानंतर सती मातेच्या फोटोचे किंवा वडाच्यामुळाजवळ पुरुष सुक्तासह अभिषेक करावा. वटवृक्षाला तिहेरीदोरा गुंडाळताना ‘अवैधव्यं च सौभाग्यं’ या मंत्राचे पठण करावे.वडाला पाणी अर्पण करताना विशिष्ट मंत्रांचा जप करावा.शेवटी आंब्याचा नैवेद्य दाखवून वडाला तीन प्रदक्षिणाघालाव्यात. सुवासिनींची ओटी भरावी. असा आहे साडेसहा तासांचा मुहूर्त सोमवारी पहाटे ३.७ ते ३० तारखेच्या पहाटे ५.२७मिनिटांपर्यंत पौर्णिमेचा काळ आहे. यातच पहाटे३.७ ते दुपारी ४.१७ मिनिटांपर्यंत भद्रा काळसांगण्यात आला आहे. दरम्यान, पौर्णिमाअसल्याने या दिवशी भ्रदा काळ पाळू नये, असेज्योतिषाचार्य ऋषिकेश चौधरी यांनी सांगितले.सकाळी ९.१२ मिनिट ते सकाळी १०.५२मिनिटांपर्यंत शुभ, तर ३.५२ मिनिट ते संध्याकाळी७.१२ मिनिटांपर्यंत लाभ, अमृत मुहूर्त आहेत. वडाची फांदी तोडून पूजन अमान्य
पर्यावरणाचे रक्षण करणे हेच खरे देवत्व आहे.वडाची फांदी तोडून त्याचे पूजन करणे हे शास्त्रातमान्य नाही. त्याला पर्याय म्हणून ब्रह्म-सावित्री-वटवृक्ष यांच्या फोटोचे पूजन करणे शास्त्रशुद्धआणि पर्यावरणपूरक ठरेल.
अनंत पांडव गुरुजी, ज्योतिषाचार्य
Source link
आज वटपौर्णिमा, पूजेचा मुहूर्त 6 तास, भद्रा काळातही नाही अडथळा:सकाळी 9: 12 ते 10: 52 तर दुपारी 3:52 ते 7:12 वाजेपर्यंत शुभमुहूर्त