Headlines

आमदार सत्यजित तांबेंवर गुन्हा दाखल:नाशिक-पुणे रेल्वे प्रश्नी आंदोलन भोवले, जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप




नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग जुन्या आराखड्यानुसारच (नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण) राहावा, या मागणीसाठी आज अहिल्यानगरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारातील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून हे बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आमदार तांबे यांच्यासह तब्बल 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्व घडामोडींमुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण मार्गे व्हावा, या मागणीसाठी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारातील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनानंतर आमदार तांबे यांच्यासह आंदोलकांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता असून, वावी पोलिस ठाण्यात त्यांच्यासह तब्बल 300 ते 350 आंदोलकांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय म्हणाले सत्यजित तांबे? आजच्या आंदोलनादरम्यान बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले की, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचा मार्ग जुन्याच आराखड्यानुसार व्हावा, या प्रमुख मागणीसाठी नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना 500 कोटींहून अधिक रकमेचे वाटप झाले असून, 22 फेब्रुवारी 2026 रोजी मांडलेल्या प्रश्नानुसार शासनाने एक समिती नेमली आहे. यावेळी चर्चेसाठी आलेल्या प्रांत शशिकांत मंगरुळे यांच्यासमोर आंदोलकांनी दोन प्रमुख मागण्या ठेवल्या, ज्यामध्ये शास्त्रज्ञ, दोन विभागीय आयुक्त आणि रेल्वे बोर्डाचे अधिकारी असलेल्या काकोडकर समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देणे आणि केवळ तांत्रिक बाबींचा विचार न करता जनभावनेचा आदर करून जुन्याच मार्गाने रेल्वे प्रकल्प राबवणे, यांचा समावेश आहे. तसेच, समृद्धी महामार्गावरील आंदोलनातून सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्ट करत याप्रश्नी शासनाकडून लेखी आश्वासन प्राप्त झाल्याची माहितीही आमदार तांबे यांनी यावेळी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *