Headlines

स्वातंत्र्यदिनी मद्यविक्रेता संघटनेचे महारक्तदान शिबीर:जिल्ह्यात दोन ठिकाणी आयोजन, 2 हजार बॉटल्सचे लक्ष्य




अमरावती जिल्हा मद्यविक्रेता संघटना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वातंत्र्यदिनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल ॲनिमिया, हिमोफिलिया आणि रक्ताचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना रक्ताची वारंवार गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी २ हजार बॉटल रक्त संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे शिबिर जिल्ह्यात अमरावती शहर आणि धारणी अशा दोन ठिकाणी आयोजित केले जाईल. अमरावती शहरातील रक्तदान शिबिर कॅम्प परिसरातील हॉटेल ग्रँड महफीलच्या रुबी हॉलमध्ये होईल. तर, धारणी येथील शिबिर उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या माध्यमातून योग्य ठिकाणी घेण्यात येणार आहे. मद्यविक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक नितीन देशमुख यांनी ही माहिती दिली. दोन्ही शिबिरांमध्ये संघटनेचे पदाधिकारी, त्यांच्या आउटलेटमधील कर्मचारी आणि सामाजिक क्षेत्रातील तरुण सहभागी होणार आहेत. दोन्ही शिबिरांची सुरुवात सकाळी ८ वाजता होईल. अमरावती येथील शिबिर मोठे असल्याने, येथे जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमएमसी आणि गोडे कॉलेजमधील रक्तपेढी तसेच बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढीचे अधिकारी-कर्मचारी सहकार्य करतील. याशिवाय, नागपूर येथील रेनबो रक्तपेढीचे अधिकारी-कर्मचारी देखील रक्त संकलनात सहभागी होणार आहेत. या आयोजनावेळी नितीन देशमुख यांच्यासह संघटनेचे सचिव सचिन हिवसे आणि सागर भेटाळू, उपाध्यक्ष अनिल भामोरे, विजय जयस्वाल, सुरेश चांदवानी आणि दीपक गुडधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *