![]()
वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अवघ्या दोन महिन्यापुर्वीच रूजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी रविवारी ता. ९ काढले आहेत. कुरुंदा पोलिस ठाण्यातून बदली झालेले रामदास निरदोडे यांना वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला होती. दोन महिन्यापुर्वीच त्यांनी पदभार स्विकारला होता. मात्र आज अचानक पोलिस अधिक्षक लोढा यांनी त्यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांच्या जागेवर कळमनुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमांकात पुणे यांची नियुक्ती करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत त्यांनी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात कामकाज करावे असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे. अचानक निघालेल्या या आदेशामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, इंजनगाव येथे मागील आठवड्यात एक ध्वज लावल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गावकऱ्यांची समजूत काढून ध्वज काढण्यात आला होता. मात्र ध्वज काढल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्या ठिकाणी महापुरुषांचा पुतळा उभारण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा इंजनगाव चर्चेत आले होते. पोलिस अधिकारी व महसूल प्रशासनाचे अधिकारी गावात तळ ठोकून होते तर गावात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. सदर प्रकरण सहाय्यक पोलिस निरीक्षक निरदोडे यांच्या बदलीसाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांची नियंत्रण कक्षात बदली केल्याचेही बोलले जात आहे.
Source link
सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली:पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी काढले आदेश