![]()
येथील रामवाडी परिसरात जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, संपूर्ण सुरक्षा केंद्र, सुरक्षा क्लिनिक तसेच आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र (रामवाडी-सर्जेपुरा) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील
.
या प्रसंगी रोहिणी बोरुडे (स्टाफ नर्स), डॉ. आकांक्षा हराळे, नीता उडानशिवे, सामाजिक कार्यकर्ते विकास उडानशिवे, विनय इदे (समुपदेशक), सागर फुलारी (व्यवस्थापक, संपूर्ण सुरक्षा केंद्र), वैशाली कुलकर्णी, रोहन भांबळ तसेच राहुल खैरनार आदी उपस्थित होते.
डॉ. आकांक्षा हराळे यांनी आरोग्याची व्याख्या स्पष्ट केली. “आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी असणे होय,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच नागरिकांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
रोहिणी बोरुडे यांनी असंसर्गजन्य आजारांबाबत मार्गदर्शन करून नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली व महिलांना विशेष आरोग्यविषयक सल्ला दिला. नीता उडानशिवे यांनी आरोग्य संवर्धन आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांविषयी माहिती दिली.
एचआयव्ही/एड्स आणि गुप्तरोग जनजागृती विषयावर बोलताना समुपदेशक विनय इदे यांनी नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. एचआयव्ही, गुप्तरोग, कावीळ यांसारख्या आजारांची वेळेवर तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रोहन भांबळ, वैशाली कुलकर्णी आणि सागर फुलारी यांनीही विविध आजारांबाबत माहिती देऊन उपस्थितांचे समुपदेशन केले. या शिबिरामध्ये थायरॉईड, उच्च रक्तदाब, मधुमेह, कावीळ, एचआयव्ही, गुप्तरोग, सिरम कॅल्शियम आदींच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. तसेच पुढील विविध प्रगत रक्त तपासण्यांसाठी नागरिकांची नावनोंदणीही करण्यात आली.दैनंदिन मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत व सहज आरोग्यसेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रामवाडी येथील आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र करत आहे. रक्तदाब, मधुमेह तपासणी, लसीकरण, माता-बाल आरोग्य सेवा आणि आरोग्य समुपदेशन यांमुळे हे केंद्र खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी जीवनदान ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिबिरामध्ये महिला रुग्णचंी तपासणी करताना.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा सामाजिक कार्यकर्ते विकास उडानशिवे यांनी केंद्राच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “हे केंद्र परिसरातील कष्टकरी व असंघटित कामगारांसाठी आशेचा किरण ठरले आहे. गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळवून देण्याचे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम या केंद्रामार्फत सुरू आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सुरक्षा केंद्र, सुरक्षा क्लिनिक तसेच आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र रामवाडी-सर्जेपुरा येथील सर्व कर्मचारी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.