![]()
अल्पवयीन मातांची धक्कादायक प्रकरणे उघडकीस आली. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. याविषयी जिल्हाधिकारी यांनी बुधवारी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका आरोग्य विभागाने आम्ही अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, मात्र आमची सुरक्षा होणे गरजेचे आहे. तसेच आम्हाला सहआरोपी करू नका, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महापालिकेच्या दवाखान्यात वर्षभरात ८६ अल्पवयीन माता असल्याचे प्रथम समोर आले. याचा शोध घेतला असता यापैकी फक्त १८ अल्पवयीन माता होत्या आणि याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर नव्याने अल्पवयीन मातांचा शोध लागल्यानंतर ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर काही लोकांकडून आशा वर्कर यांना दमदाटी करण्यात आली. काम योग्य पद्धतीने करुनही आम्हाला धमक्या येत आहेत. त्यामुळे आशा वर्कर यांची सुरक्षा तेवढीच महत्वाची आहे. उपाययोजना करण्याची मागणी केली. आशा वर्कर यांच्या माध्यमातून अल्पवयीन मातांची माहिती डॉक्टराकडून पोलिसांना दिली जात असताना आशा वर्कर किंवा डॉक्टर यांना सहआरोपी करू नये, अशी मागणी यावेळी महानगरपालिका आरोग्य विभागाने केली. तसेच अल्पवयीन मातांचा शोध लागल्यानंतर त्याची माहिती किती वेळेत पोलिसांना द्यायला हवी ? डॉक्टर म्हणून आम्हाला मातेची प्रसूती करावी लागेल. यानंतर पोलिसांना आरोग्य विभागाने काय सांगावे ? आदी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावेळी याबाबत बाल हक्क आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे मागवता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी संागितले. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. १३ अल्पवयीन मातांची माहिती पोलिसांना देणार आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका आरोग्य विभागाने शहरातील सर्व १३७ दवाखान्यांची पाहणी केली. दवाखान्यांच्या तपासणीमध्ये वर्षभराचे त्यांचे रजिस्टर पाहण्यात आले . या पाहणीत १३ अल्पवयीन माता आढळून आल्या. या सर्व अल्पवयीन मातांच्या नावांची यादी महानगरपालिका आयुक्तांमार्फत पोलिस आयुक्तांना दिली जाईल, असे मनपा आरोग्य विभागाने यावेळी संागितले.
Source link
आरोग्य विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:‘अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, पण आम्हाला सहआरोपी करू नका’