Headlines

MH 12 कोड कायम राहणार:पुण्याच्या वाहन नोंदणीची ओळख अबाधित ठेवण्यास नितीन गडकरींची ग्वाही




पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या एमएच १२ झेडझेड ही शेवटची मालिका सुरू असून, विद्यमान नोंदणी मालिका संपत आल्याने पुढील पर्यायी मालिकांबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचा वाहन नोंदणी कोड एमएच १२ बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पुण्याची ओळख बनलेला हा कोड कायम ठेवण्याबाबत सकारात्मक घडामोड झाली आहे. या विषयावर केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन, पुण्याची ओळख असलेला एमएच १२ हा वाहन नोंदणी क्रमांक कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच त्याच क्रमांकाअंतर्गत पुढील पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची विनंतीही करण्यात आली. या मागणीवर नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एमएच १२ हा वाहन नोंदणी क्रमांक कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शहराची दीर्घकाळापासूनची वाहन नोंदणीची ओळख कायम राहण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. पुणेकरांसाठी एमएच १२ हा केवळ वाहन नोंदणी क्रमांक नसून शहराच्या ओळखीचा आणि अभिमानाचा भाग मानला जातो. त्यामुळे हा क्रमांक कायम ठेवण्याच्या हालचालींना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, पर्यायी नोंदणी मालिका सुरू करतानाही एमएच १२ ही ओळख कायम राखण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *