Headlines

उमराणेत महामार्गालगत 80 फूट खोल उघडी विहीर:विहिरीला संरक्षक भींत किंवा जाळीही नाही; देवळा पोलिसांकडून टोल प्रशासनाची कानउघाडणी




रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरींमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असतानाच, उमराणेजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक ८० फूट खोल उघडी विहीर आहे. ही विहीर थेट जमिनीच्या समतल पातळीवर असून, तिच्याभोवती कोणतीही संरक्षक भिंत किंवा जाळी नाही. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट टोल प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दिंडोरी येथील भीषण विहीर दुर्घटनांचा दाखला देत सहाय्यक निरीक्षक नंदा पाटील यांनी टोल प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले. पोलिसांनी संबंधित विभागाला पत्र पाठवत तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत: लोखंडी जाळी: विहिरीभोवती २४ तासांच्या आत लोखंडी संरक्षक जाळी उभारणे. बॅरिकेडिंग: वाहनचालकांना दुरूनच अंदाज यावा, यासाठी बॅरिकेड्स लावणे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *