![]()
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी आणि प्रीमियम प्रवास क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या मक्तेदारीला सुरुंग लावत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात तब्बल २०० अत्याधुनिक, वातानुकूलित स्वमालकीच्या व्होल्वो बसेस दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वमालकीच्या व्होल्वो बसेसचा ताफ्यात समावेश केला जात असून यामुळे ‘लालपरी’ आता नव्या दिमाखात आणि ‘हायटेक’ रूपात रस्त्यावर धावतील परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील माहिती दिली. २५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवर खासगी ट्रॅव्हल्सचा मोठा वरचष्मा पाहायला मिळतो. या प्रवाशांना एसटीकडे वळवण्यासाठी महामंडळाने खासगी सेवेपेक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वसोयींनी युक्त असा हाय-एंड प्रवासाचा प्लॅन आखला आहे. ताफ्यात येणाऱ्या २०० बसेसपैकी १७० बसेस या आरामदायी ४५ आसनांच्या असतील, तर ३० बसेस या शयनयान स्वरूपाच्या असतील. दिवसाच्या प्रवासासाठी ५ ते ६ तासांच्या मार्गावर आसनी बसेस, तर रात्रीच्या प्रवासासाठी शयनयान बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. खासगी ॲपवरूनही तिकीट बुकिंग होणार आहे. एसटी नवा अध्याय रचणार “प्रवाशांचा विश्वास आणि एसटीचे जाळे ही आपली मोठी ताकद आहे. त्याला आता आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल आरक्षण आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासात एसटी नवा अध्याय रचत आहे. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, एसटी महामंडळ ट्रॅव्हल्सला देणार आव्हान एसटी महामंडळाचा हा निर्णय म्हणजे खासगी ट्रॅव्हल्सच्या मक्तेदारीला थेट आव्हान देणारी आक्रमक ‘व्यावसायिक रणनीती’ आहे. महामंडळाने घेतलेला हा निर्णय लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
Source link
एसटीच्या ताफ्यामध्ये 200 वातानुकूलित व्होल्वो बसेस:170 बसेस आरामदायी 45 आसनांच्या असणार