![]()
महाराष्ट्र पोलिसांच्या ‘ऑपरेशन कवच’ उपक्रमांतर्गत तिवसा पोलीस स्टेशनच्यावतीने जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक इंद्रधनुष्य शाळा, गुरुदेवनगर येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना तसेच कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, पोलिस उपनिरीक्षक विद्या कळसे, मोझरी बीट चौकी प्रमुख हवालदार रवींद्र लांजेवार, मदतनीस प्रकाश सोनवणे तसेच रमेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. तसेच सायबर फसवणूक, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, महिला व बालकांची सुरक्षा, आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची काळजी आदी विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता ढेवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मान्यवर पोलिस अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षिका स्नेहल दिवाण, प्रमिला आखरे, स्वाती सुनील बोकाडे, संगीता संतोष साव, प्रियंका देशमुख-काळे, अर्चना दंडाळे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Source link
ऑपरेशन कवचअंतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांना दिले सुरक्षिततेचे शिक्षण:मोझरी पोलिसांची इंद्रधनुष्य शाळा, गुरुदेवनगर येथे जनजागृती उपक्रम