![]()
केवळ ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करून किंवा त्या दिवसापुरतेच निसर्गाविषयी वर्तन ठेवून आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत. वर्षभर पर्यावरण संवर्धनाबाबत पोषक पद्धतीने वागणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे, हाच नवा दृष्टिकोन या श
.
निसर्गाच्या सानिध्यातून शिक्षणाची सुरुवात कशी होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. १ येथे केवळ पुस्तकी धडे दिले जात नाहीत, तर रोज सकाळी मुले निसर्गाशी जोडली जातात. सेंद्रिय परसबाग फुलवणे, पक्षी निरीक्षण करणे, बियांचा संग्रह करणे आणि स्वतः लावलेल्या झाडाचे फुल शिक्षकांना आणून देणे, अशा प्रभावी कृतीतून लहान वयातच मुलांमध्ये पर्यावरण रक्षणाचे बीज रोवले.
शाळेच्या आवारात पाऊल ठेवताच आपल्याला विद्यार्थ्यांचा उत्साह आणि निसर्गाचे सुंदर वातावरण पाहायला मिळते. येथे पालक जेव्हा शाळेला भेट देतात, तेव्हा त्यांच्याच हस्ते वृक्षारोपण करून घेतले जाते. सण साजरे करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत; मुले स्वतः इको फ्रेंडली रंग तयार करून होळी आणि रंगपंचमी साजरी करतात. दिवाळी फटाकेमुक्त होते आणि प्लॅस्टिक ऐवजी कागदापासून सुंदर आकाशकंदील बनवले जातात. रक्षाबंधनाला तर कागद आणि बियांचा वापर करून पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या जातात.
घरी आलेल्या प्लास्टिकचा संग्रह करणे आणि त्याचा पुनर्वापर करून थेट रोपवाटिका तयार करणे, हा या ^आज एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना प्रत्येकाने पर्यावरण विषयक योगदान देणे आवश्यक आहे, तरच भविष्यात इतर सजीवांप्रमाणेच मानवाचे अस्तित्व टिकेल. बिभीषण सातपुते, पर्यावरण प्रेमी शिक्षक खातगाव शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने संपूर्ण गावाचे चित्र बदलताना पाहिले आहे. शिक्षक बिभीषण सातपुते आणि मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे हे आपल्या सहकारी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरण पूरक उपक्रम राबवत आहेत. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर गावातील प्रत्येक माणसाला जागृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या याच सातत्यपूर्ण आग्रहाचा आणि प्रयत्नांचा परिणाम दिसून येत आहे. या एकाच उपक्रमातून एकापाठोपाठ एक अशा भिवरवाडी, कोंढार चिंचोली, खातगाव नं. २ आणि आता खातगाव नं. १ या सर्व शाळा ‘हरित शाळा’ म्हणून अधिकृतपणे समोर आल्या आहेत. प्रत्येक शाळेने हा पॅटर्न राबवल्यास शाश्वत विकासाचे ध्येय गाठणे प्रशासनाला सहज शक्य होईल. शाळेचा सर्वात मोठा यशस्वी पॅटर्न आहे. या रोपांची लागवड करणे किंवा आवश्यकतेनुसार त्याचे वाटप केले जाते. यासोबतच जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शोष खड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जल पुनर्भरण यासारख्या उपक्रमांतून जनजागृती केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत जनजागृती, जल प्रदूषण रोखणे, मृदा परीक्षण करून मातीचे नमुने गोळा करणे आणि त्यातून मातीचे विविध प्रकार शिकणे असे अभ्यासपूर्ण उपक्रम वर्षभर सातत्याने राबवले जातात.
पर्यावरण विषयक योगदान देणे आवश्यक
प्रत्येक शाळेने हा पॅटर्न राबवावी