Headlines

कळमनुरी तालुक्यातील तरोडा गावाजवळ गोवंश तस्करी करणारे वाहन पकडले:तीन जनावरांची सुटका, चालका विरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




कळमनुरी तालुक्यातील तरोडा गावाजवळ तीन गोवंश कत्तलीसाठी निर्दयीपणे वाहतूक करणारे वाहन पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. वाहन व गोवंश असा २.८० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी वाहन चालका विरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात रविवारी ता. २० दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. कळमनुरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील वाई ते तरोडा मार्गावर एका पीकअप वाहनातून गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यावरून पोलिस उपाधिक्षक मयूर रसाळ, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार कैलास गुंजकर, गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे यांच्या पथकाने आज सकाळी ९ वाजल्या पासून या मार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली होती. यामध्ये पोलिसांनी एक वाहन थांबवून चालक शेख बरकत शेख मोसीन (रा.कळमनुरी) याची चौकशी केली. मात्र चौकशीत त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात एक गाय व दोन बैल असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चालक शेख बरकत याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा व मालकी परवाना तसेच इतर कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे कागदपत्रे आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांनी तीन जनावरे व एक पिकअप वाहन असा २.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कळमनुरी पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी उपनिरीक्षक गव्हाणे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात रविवारी ता. २० गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक गव्हाणे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *