![]()
कुर्डुवाडी शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या माढा रस्त्यावर सध्या अवैध अतिक्रमणाचा प्रचंड उद्रेक झाला असून शहराचे पूर्णपणे विद्रुपीकरण होत आहे. झाडांची कत्तल करून आणि गटारींवर स्लॅब टाकून ६० ते ६५ फूट रुंदीकरण करण्यात आलेला हा रस्ता आता अतिक्रमणांच्
.
माढा रस्ता हा कुर्डुवाडी शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रमुख जिल्हामार्ग असून शहराचा ‘चेहरा’ मानला जातो. अमृत भारत योजनेअंतर्गत या शहरातील रेल्वे जंक्शनची इमारत अत्यंत सुंदर आणि देखणी केली असली तरी स्टेशनच्या बाहेर पडताच शहराचे विद्रुपीकरण समोर येत आहे.याच मार्गावर पोलिस ठाणे, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, विविध सरकारी कार्यालये व शाळा,कॉलेज आहेत. नुकतेच या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले. मात्र, काम पूर्ण होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनधिकृत दुकानांचा सुळसुळाट झाला आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस विभाग या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अधिकारी व स्थानिक पुढाऱ्यांच्या संगनमतामुळेच हे अतिक्रमण वाढले आहे, असा थेट आरोप नागरिक करत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, फळ-भाजी विक्रेते, चिकन-मासे विक्रेते तसेच अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी स्टॉल्स थाटले आहेत. खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यावरच रिक्षा व गाड्या उभ्या करत असल्याने ६०-६५ फुटांचा रस्ता अत्यंत अरुंद बनला आहे. चारचाकी वाहनांना येथून जाणे अशक्यप्राय झाले असून दुचाकीस्वारांना तर कसरतच करावी लागत आहे. तर विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. माढा रोडवर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून मोकाट जनावरांचे जत्थे रस्त्यात ठाण मांडून बसलेले असतात. पादचारी मार्ग गिळंकृत केल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे धोकादायक झाले आहे. प्रशासनाने अतिक्रमणधारकांची पर्यायी व्यवस्था करून हा रस्ता मोकळा करावा. – अजय रणसुभे, सूज्ञ नागरिक, कुर्डूवाडी स्थानिक व्यापारी व रहिवाशांनी सोशल मीडियावरून पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.यासंदर्भात बैठक घेतली असून, त्यांना आरक्षित असलेल्या जागेत स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. एक-दोन दिवसांत नोटीसा बजावल्या जातील. हा रस्ता पूर्णपणे मोकळा केला जाईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र हे आश्वासन बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात असे झाले आहे.
पादचारी मार्ग गिळंकृत केला