Headlines

धीरज यांच्या मृत्यूनंतर शहरामध्ये कडकडीत बंद; कब्रस्तानात अंत्यविधीच्या पावित्र्याने पेच:मुकुंदनगर येथील हल्ल्यात जखमी झालेल्या परदेशींचा अखेर मृत्यू; शहरासह उपनगरांत तणाव‎



मुकुंदनगर येथे मारहाणीत जखमी झालेल्या मनपाच्या पथदिवे दुरुस्तीच्या ठेकेदार संस्थेचा कर्मचारी धीरज रजपूत – परदेशी यांचा तिसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी पसरताच संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला. सकल हिंदू समाजाच्या वत

.

तेलंगणातून तिघे ताब्यात, शहरातूनही दोघांना अटक दरम्यान, मयत धीरज कचरुसिंग रजपूत – परदेशी (रा. माधवबाग, भिंगार) यांच्या मृत्यूप्रकरणी मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद, मुस्तकिम ख्वाजामिया सय्यद या तिघांना तेलंगणा येथून अटक करण्यात आली आहे. तर शहरातून ख्वाजामिया उर्फ अक्रम याकूब सय्यद व वसीम रहीम सय्यद यांना अटक करण्यात आली. तसेच, युनुस शेख याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

समाजात वेगळा संदेश देण्यासाठी धीरजच्या हत्येचा कट : जगताप आमदार संग्राम जगताप यांनी पोलिस प्रशासनाच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. जुन्या वादाचे कारण पुढे करून पोलिस जाणीवपूर्वक तपासात दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्यक्ष घटनाक्रम आणि पोलिसांची माहिती यात मोठी विसंगती असून पोलिस जाणीवपूर्वक मूळ वस्तुस्थिती लपवत आहेत. समाजात वेगळा संदेश देण्यासाठी धीरजच्या हत्येचा कट रचला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *