![]()
दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या… तरीही हरिनामाचा गजर करत नेवासाकडे येणाऱ्या वारकऱ्यांच्या लाटा काही थांबत नव्हत्या… ‘ज्ञानेश्वर माऊली… माऊली ज्ञानेश्वर’, ‘पंढरीनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने नेवासे नगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती. माऊलींच्या
.
मंदिर प्रांगणात पंचगंगा सिड्स कंपनीचे प्रभाकर शिंदे व माजी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीने साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर रविराज तलवार यांच्यावतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. स्वप्नील मगर यांनी दिवसभर पाण्याचे वाटप केले. लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेसह सुवर्णकार समाजाच्यावतीने संत नरहरी महाराज मंदिरात भाविकांना मसाला दूध वाटप करण्यात आले. आमदार लंघे यांच्या कार्यालयात तसेच नागेबाबा पतसंस्थेच्यावतीने पावन गणपतीसमोर दिवसभर खिचडीचे वाटप सुरू होते. मोहिनीराज मंदिराजवळ ब्राह्मण संघटनेच्यावतीने दिवसभर चहा व उकडलेले शेंगादाणे वाटण्यात आले.
सुमारे ३०० दिंड्यांचे आगमनाने परिसर दुमदुमला संत ज्ञानेश्वर मंदिराच्या प्रांगणाबाहेर एकादशीच्या निमित्ताने सुमारे ३०० दिंड्यांचे सोहळे पार पडले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या रथाचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली. वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि माऊलींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दर्शनबारीसह मुखदर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.