Headlines

कुर्डूवाडीत ख्रिश्चन दफनभूमीची दुरवस्था:मंजूर 20 लाखांचा निधी स्वार्थापोटी वळवला; संरक्षण भिंतीअभावी थडग्यांची विटंबना‎



कुर्डूवाडी शहरातील ख्रिश्चन समाजाच्या दोन स्मशानभूमी सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे मरणयातना सोसत आहेत. बार्शी रोडवरील १०८ वर्षांचा इतिहास लाभलेली जुनी दफनभूमी असो वा करमाळा रोडवरील नवीन दफनभूमी, दोन्ही ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल

.

भोसरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०२२-२३ मध्ये ख्रिश्चन स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे हा निधी कुर्डूवाडी नगरपालिकेकडे वळवण्यात आला. परिणामी, १०८ वर्ष जुन्या दफनभूमीचे काम रखडले. दुसरीकडे, नव्याने उभारलेल्या स्मशानभूमीवर २० लाख खर्च करूनही तिथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. सात वर्षे उलटूनही नगरपरिषदेने ही जागा समाजाला हस्तांतरित केलेली नाही.

कुर्डूवाडीत सुमारे ५०० मतदान असलेल्या ख्रिश्चन समाजाला निवडणुका आल्या की आमदार-खासदारांकडून आश्वासनांचे गाजर दाखवले जाते. मात्र, निवडणूक संपली की लोकप्रतिनिधी गायब होतात. भांबुरे वस्तीतील जुन्या दफनभूमीला संरक्षण भिंत नसल्याने तिथे मोकाट जनावरांचा वावर असतो, तर पावसाळ्यात पाणी साचून थडग्यांचे नुकसान होते. स्वच्छता कर्मचारी नसल्याने समाज बांधवांना स्वतः श्रमदान करून परिसर साफ करावा लागत आहे.

तसेच या कमिटीने सर्व दफनभूमींचे सीमांकन करणे, नियमित स्वच्छता, पाणी-वीज व्यवस्था आणि प्रार्थना कक्ष स्थापन करण्याची मागणी केली आहे. . सुरक्षेचा अभाव: संरक्षण भिंत नसल्याने बोअरवेलचे स्टार्टर आणि पाइप चोरीला जात आहेत. . अंतर्गत रस्ते नाहीत: अंत्यविधीसाठी जाताना चिखल आणि झाडे-झुडपांमुळे मोठी अडचण निर्माण होते. . विश्रांतीची सोय नाही: अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी निवारा शेड किंवा बसण्यासाठी बाकडे नाहीत. . अतिक्रमण: सीमांकन नसल्याने दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमणाचे सावट आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *