Headlines

कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी वाहिनी विलगीकरणाची कामे वेगाने करा:महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश




राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत कृषी वाहिनी विलगीकरणाची कामे वेगाने करा. तसेच स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचे शंकानिरसन तसेच ग्राहक मेळावे घेऊन प्रबोधन करा, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाची आढावा बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विकासकामे, वीजपुरवठा, महसूल वसुली आणि ग्राहक सेवा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाहिनी विलगीकरणावर विशेष भर औंढेकर म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र अनेक भागांत कृषी वाहिनी विलगीकरणाची कामे अपूर्ण असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. त्यामुळे सर्व कार्यकारी अभियंते आणि उपविभागीय अभियंत्यांनी स्वतः लक्ष घालून ही कामे तातडीने पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. सौरऊर्जा निर्मितीत सातत्याने वाढ राज्यात सध्या ६.९३ लाख ग्राहकांनी उभारलेल्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांतून सुमारे ५,६०० मेगावॅट, तर ११ लाख सौर कृषिपंपांमधून सुमारे ३,००० मेगावॅट वीज निर्मिती होत असल्याची माहिती औंढेकर यांनी दिली. पुढील दोन ते तीन महिन्यांत छतावरील सौर प्रकल्पांची क्षमता ७,००० मेगावॅटपर्यंत वाढण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांशी संवाद साधा स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंका दूर करण्यासाठी ग्राहक मेळावे आयोजित करावेत आणि व्यापक जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (स्मार्ट) योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील व दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात सौरऊर्जा प्रणाली बसविण्याचा लाभ मिळावा, यासाठी अधिकाधिक ग्राहकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी केले. वीजबिल वसुली आणि वीजचोरीविरोधात मोहीम छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील थकीत वीजबिलांची वसुली गतीने करण्याबरोबरच ग्राहकांना अचूक वीजबिले मिळतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही औंढेकर यांनी दिल्या. चुकीची बिले तातडीने दुरुस्त करून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. याशिवाय वीजगळती कमी करण्यासाठी वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविणे, तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला अधीक्षक अभियंते मनीष ठाकरे, युवराज जरग, गोरक्षनाथ सपकाळे, बीना सावंत, महेश पवार, शुभांगी कटकधोंड, प्रभारी महाव्यवस्थापक प्रवीण गायकवाड, प्रभारी सहायक महाव्यवस्थापक शंकर कुलकर्णी यांच्यासह परिमंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते आणि लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *